रेल्वेतही आता शॉपिंगची सुविधा

Railway
Railway

इगतपुरी - रेल्वेचा प्रवास स्वस्त अन्‌ मस्त मानला जातो. प्रवासात विविध सुविधा असल्यावर तो अधिकच सुखकारक ठरतो. ही बाब लक्षात घेऊनच लांब पल्ल्याच्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता शॉपिंगची सेवा सुरू होणार आहे.

पश्‍चिम रेल्वेच्या 16 मेल आणि एक्‍स्प्रेस गाड्यांमध्ये लवकरच ही सेवा सुरू होईल. एचबीएन प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीला याबाबतचे कंत्राट देण्यात आले. रेल्वेतून आरपीएफ व रेल्वे पोलिसांच्या सहकार्याने चालणाऱ्या या अनधिकृत विक्रीला आळा घालण्यासाठी व त्या अनुषंगाने रेल्वेचा महसूल वाढविण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. नव्या कंत्राटानुसार कंपनीचे दोन सेल्समन रेल्वेत असतील. कंपनीचे ओळखपत्र आणि गणवेशही त्यांना दिले जाणार आहेत. रेल्वेत "शॉपिंग कार्ट' उपलब्ध असेल. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड अथवा रोख रक्कम देऊन प्रवासी खरेदी करू शकतील.

अशी आहे योजना
* पश्‍चिम रेल्वेतर्फे या सेवेच्या प्रारंभाचे आठ टप्पे
* प्रत्येक टप्प्यामध्ये दोन नव्या गाड्यांचा समावेश
* मुंबई-अहमदाबाद एक्‍स्प्रेसपासून सुरवात
* पश्‍चिम रेल्वेच्या 16 मेल व एक्‍स्प्रेस ट्रेनमध्ये प्रारंभ

या वस्तू विकता येतील
* सौंदर्य प्रसाधने, घरगुती आणि स्वयंपाकगृहात लागणारे सामान, व्यायामाचे साहित्य
* सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत विक्रीची परवानगी

या वस्तूंच्या विक्रीस मनाई
* खाद्य पदार्थ, तंबाखू, सिगरेट आणि गुटखा, जर्दा यांसारखे पदार्थ
* रेल्वे आणि राज्य सरकारकडून बंदी घालण्यात आलेली कोणतीही वस्तू

महसुलात वाढ हा सध्या सर्वच क्षेत्रांत कळीचा मुद्दा आहे. "आरएलडीए'चे अधिकारी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर शॉपिंग मॉल सुरू करण्यासंदर्भात पाहणी करून गेले आहेत. पण मध्य विभागात धावत्या रेल्वेमध्येही ही सेवा सुरू करण्यासंदर्भात तूर्त प्रस्ताव नाही.
- कुंदन महापात्रा, वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com