येवल्यात पाणीटंचाईची सुरवात

taki
taki

येवला : गावातील पाण्याची टाकी शोभेची वास्तू बनली असून एकमेव असलेल्या हातपंपाने मान टाकल्याने तासाभराने हंडाभर पाणी मिळत आहे. गावालगतचा बंधारा देखील कोरडा झाला असून, यात काहींनी आडवे बोअर टाकल्याच्या तक्रार झाली आहे.

सार्वजनिक विहिरीने तळ गाठला आहे,या सर्व स्थितीत भीषण टंचाई निर्माण झाली असून सर्व गावाला पाण्याच्या शोधात अख्खा दिवस खर्च करावा लागत आहे.
ममदापुर गावाची ग्रामदेवता तुकाई देवीची यात्रा येत्या शनिवार (ता.३१) पासून सुरू होत असून यात्रेच्या तोंडावर येथे पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्याची मागणी छत्रपती मंडळाने केली आहे.

पाणीच उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे.येथे आजपर्यंत एकही पिण्याच्या पाण्याची योजना प्रभावीपणे सुरू झाली नाही. गावात फक्त एक हातपंप असून संपूर्ण गावाची मदार त्या हातपंपावर असल्याने हातपंपाचे पाणी देखील खोल गेल्याने हातपंप हाफसण्यास जड जात आहे. ग्रामपंचायतीने मोठा खर्च करून बांधलेली पाण्याची टाकी फक्त शोभेची वस्तू बनली असून असून अडचण नसून खोळंबा अशी गत झाली आहे.

टंचाईच्या तीव्रतेमुळे ग्रामपंचायतीने पाण्याच्या टँकरचा प्रस्ताव पंचायत समितीकडे २१ जानेवारीला दिला असून आतापर्यंत वारंवार सांगूनही टँकर सुरु झालेला नाही. प्रशासन व लोकप्रतिनिधी यावर उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.आता मात्र कामधंदा सोडून ममदापुरकराना पाण्यासाठी दाही दीशा भटकण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने या गंभीर पाणी प्रश्नांकडे लक्ष द्यावे तसेच टँकरची  व्यवस्था लवकरात लवकर करावी अशी मागणी छत्रपती मित्र मंडळाच्या वतीने दिनेश राऊत ,देविदास गुडघे, अनिल गुडघे, समाधान जानराव, सुनील कुलकर्णी, ज्ञानेश्वर काळे, ज्ञानेश्वर केरे, डिंगबर जाधव, निलेश जाधव यांनी केली आहे.

बंधाऱ्यातील पाण्याचा झाला उपसा..!
येथे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असुन बंधाऱ्यातील पाण्याचा उपसा झाल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांकडे केली आहेत. गावाच्या शेजारी १९७२ मधील दुष्काळात पाण्याची व्यवस्था म्हणून बंधारा बाधला असुन दरवर्षी या बंधार्यात मार्च एप्रिल महिन्यात देखील पाणी असते. या वर्षी मात्र बंधारा लगत काही शेतकर्यानी आडवे बोर घेऊन स्वतः च्या विहिरीत पाणी घेऊन शेततळे भरून घेतले आहे. काम चालू असताना तलाठी,मंडल अधिकारी याना बोलवून सदर आडवे बोअरींगचा पंचनामा केला खरा परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही,असे निवेदनात म्हटले आहे.

ग्रामपंचायतने जानेवारी महिन्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅकरची मागणी करूनही दखल न झाल्याने महिलासह पुरूषांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.त्यामुळे आता तत्काळ टँकर सुरु करा अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर शिवसेना गण प्रमुख वाल्मीक गुडघे,नवनाथ गुडघे,माजी सरपंच पोपट ठाकरे, राजाराम लबे ,कैलास बेडके , बाबासाहेब सिरसाठ , भास्कर गुडघे, नारायण गुडघे, नामदेव गुडघे,भगवान साबळे, भिका गुडघे, के.आर वाघ ,बाबुराव गुडघे आदीच्या सह्या आहेत.

प्रलंबित मेळाच्या बंधाऱ्यांचा प्रकल्प शासनाने हाती घेऊन उत्तर पूर्व भागातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी छत्रपती मंडळाचे संस्थापक देवीदास गुडघे यांनी केली.
 
"हातपंप आटले तर बंधारा कोरडा पडल्याने गावातील सार्वजनिक विहिरीत पाणी नाहीत. टॅकर मागणीचा प्रस्ताव पाठवला आहेत परंतु अद्याप टॅकर चालू झालेला नाही.", असे भगवान गायके यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com