जळगाव भाजपचाच बालेकिल्ला हे दाखवून द्या - डॉ. भामरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

जळगाव - लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे पदवीधर मतदारसंघही महत्त्वाचा आहे. त्यामुळे या निवडणुकीतही कार्यकर्त्यांनी जोमाने काम करून पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांना निवडून आणावे व या माध्यमातून जळगाव जिल्हा हा भाजपचाच बालेकिल्ला आहे, हे पुन्हा एकदा दाखवून द्यावे, असे आवाहन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज येथे भाजप पदाधिकारी व कर्यकर्त्यांना केले आहे.

पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. पाटील यांच्या प्रचारासाठी डॉ. भामरे हे जळगावात आले होते. पक्ष कार्यालयात त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांचे फटाके फोडून कार्यालयात स्वागत करण्यात आले. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस डॉ. भामरे यांनी माल्यार्पण केले. भाजप महानगरतर्फे महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे व आमदार चंदू पटेल यांनी त्यांची पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. खानदेशचा रहिवासी चंदू चव्हाण यांची पाकिस्तानातून सुखरूप सुटका केल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी मिठाई भरवून त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
डॉ. भामरे म्हणाले, की डॉ. पाटील हे वैद्यकीय क्षेत्रातील स्वच्छ प्रतिमेचे युवा उमेदवार आहेत. जळगाव जिल्हा हा भाजपचाच बालेकिल्ला आहे, हे विरोधी पक्षाला पुन्हा एकदा दाखवून द्यावयाचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून डॉ. पाटील यांना निवडून आणावे.

यावेळी उमेदवार डॉ. पाटील यांनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याप्रसंगी पक्षाचे जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी, महेश जोशी, बापू ठाकरे, नितीन इंगळे, राजू घुगे, सरिता नेरकर, वंदना पाटील, कविता सपकाळे, उज्वला बेंडाळे, महिला आघाडी जयश्री पाटील, मनोज भांडारकर, नितीन गायकवाड, संजय शिंदे, रेखा पाटील, ज्योती राजपूत, रेखा कुलकर्णी, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, प्रदेश केमिस्ट उपाध्यक्ष किशोर भंडारी, साकीरभाई मंडल अध्यक्ष प्रा. जीवन अत्तरदे आदी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Show this citadel Jalgaon bjp