कामाच्या दर्जातून अभियंता दाखवून द्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

नाशिक - जिल्हा परिषदेच्या कामांच्या दर्जाविषयी लोकांच्या तक्रारी आहेत. त्याची दखल घेऊन यापुढे जिल्हा परिषदेतील अभियंत्यांनी कामाच्या दर्जात सुधारणा करून स्वतःमधील अभियंता जागवा, अशा शब्दांत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी अभियंत्यांना कानपिचक्‍या दिल्या.

अभियंता दिनानिमित्त जिल्हा परिषदेत आज आदर्श अभियंता पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या शाखा अभियंता संघटनेतर्फे दरवर्षी अभियंता दिनानिमित्त आदर्श अभियंता पुरस्काराने व्ही. टी. शेवाळे, एम. एम. बोरसे, एस. पी. पाटील, पी. के. बच्छाव व एस. एम. सूर्यवंशी यांना गौरविण्यात आले.

ग्रामविकास राज्यमंत्री भुसे म्हणाले, की जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत काम करीत असतानाच आमचा गाव-आमचा विकास या योजनेनुसार गावोगावचे विकास आराखडे तयार करतानाही अभियंत्यांनी तांत्रिक मदत करावी. या वेळी श्री. भुसे यांनी जिल्हा परिषदेतील अभियंत्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लवकरच मंत्रालयात सचिवांची बैठक घेऊन ते मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे म्हणाल्या, की जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंत्यांच्या पदोन्नतीचा प्रश्‍न अनेक वर्षे प्रलंबित आहे. तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती त्यांनी मंत्र्यांना केली. जलयुक्त शिवार ही योजना चांगली आहे; परंतु या योजनेसाठी काम करताना उर्वरित गावांमधील लोकांचे जलसंधारणाच्या कामांकडे दुर्लक्ष व्हायला नको, असे मत व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा परिषदेच्या विविध समस्या मांडल्या. तसेच, अभियंत्यांना चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहित करतानाच त्यांच्या कार्यशैलीबद्दल कानपिचक्‍याही दिल्या. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, शिवसेनेचे गटनेते प्रवीण जाधव, यतीन पगार, भास्कर गावित, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते. अभियंता संघटनेचे श्री. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Show work Grade Engineer