मरणासन्न पिकांना श्रावण पाहळे देणार जीवदान!

संतोष विंचू 
रविवार, 12 ऑगस्ट 2018

येवला : तालुक्यात खरीप पेरणीपासून एक ही दमदार पाऊस झाला नसून मागील १२-१५ दिवसांपासून तर पाऊस बेपत्ताच असल्याने शेतातील उभी पिके मरणासन्न अवस्स्थेत आहे. माना टाकलेल्या खरीपाच्या पिकांना मोठ्या पावसाच्या डोसची गरज आहे, मात्र तो यायचे नाव घ्यायला तयार नाही. आजपासून श्रावणाच्या आगमनासोबत सरी पडू लागल्या आहेत. हेच श्रावण पाहळे मरणासन्न पिकांना जीवदान देतील अशी आशा आहे.
  

येवला : तालुक्यात खरीप पेरणीपासून एक ही दमदार पाऊस झाला नसून मागील १२-१५ दिवसांपासून तर पाऊस बेपत्ताच असल्याने शेतातील उभी पिके मरणासन्न अवस्स्थेत आहे. माना टाकलेल्या खरीपाच्या पिकांना मोठ्या पावसाच्या डोसची गरज आहे, मात्र तो यायचे नाव घ्यायला तयार नाही. आजपासून श्रावणाच्या आगमनासोबत सरी पडू लागल्या आहेत. हेच श्रावण पाहळे मरणासन्न पिकांना जीवदान देतील अशी आशा आहे.
  
पावसाळयाच्या सुरूवातीस जूनच्या पहिल्या अठवड्यात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर अधून मधून पावसाची रिपरिप चालू राहिल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील मुख्य पिक मका, कपाशी, सोयाबीन, उडीद, तूर, मूग आदी पिकाबरोबर कांदा लागवडीसाठी बियाणे टाकण्यात आले. त्यानंतर अधूनमधून पावसाची रिमझिम होत राहिल्याने व वातावरणातील आर्द्रतेने बियाणांची उगवण चांगल्या प्रकारे झाली. दीड महिन्यांचा कालावधी लोटला तर दमदार पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. मोठा पाऊस न होता केवळ अधूनमधून रिमझिम झालेल्या पाऊसाने व वातावरणातील आर्द्रतेने पिके चांगली दिसत होतो. मात्र रोज उन्हाच्या तीव्रतेने व जोरदार वारे वाहत असल्याने पिके सुकू लागली आहेत. सध्या वातावरणात उष्णता निर्माण झाली असून दुपारच्या वेळी पिके कोमेजून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अजून पच्छिम भागात पिके जोमात असले तरी पूर्व भाग बहुतांश डोंगराळ असल्याने हलक्या प्रतीच्या जमिनी असल्याने पिकांची वाट लागली आहे.

गेले दोन महिने जोरदार पाऊस पडण्याची प्रतीक्षाच आहे. त्यात श्रावणात तर हि शक्यता धूसर आहे. मात्र दरवर्षीचा अनुभव पाहता श्रावणात सरीची कृपा पिके जगण्यासाठी होते. उद्या रविवारपासून श्रावणाला सुरुवात होत असुन आज शनिवारपासूनच या सरींनी हजेरी लावली. यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो. या सरीच पिकांना जगण्यासाठी तारणहार ठरतील अशी अपेक्षा बळीराजाला आहे. मागील दहा दिवसांत सर्वच तालुके पावसासाठी आसुसलेले असून नांदगावला तर थेंबभरही पाऊस पडलेला नाही. निफाडला साडेतीन, सिन्नरला ६ तर येवल्यात १४ मिमी पावसाची नोंद झालीय.  

तालुकानिहाय पाऊस आकड्यातला (मिमी)

तालुका -- ऑगस्टची सरासरी - ऑगस्टमध्ये पडलेला पाऊस -- यावर्षीची एकूण टक्केवारी

नाशिक -- १३५ -- ८.४ -- ७१.२६
इगतपुरी  --  १०५७ -- १६८  --  ७०.४२
दिंडोरी -- १८२ --  ३९ --  ४३.६
पेठ --  ६६० -- १३९ -- ७७.२४
त्रंबकेश्वर -- ६६० -- ७३ -- ५२.६१
मालेगाव --  १०४ -- ०१ -- ३९.९३
नांदगाव --  १०६ --  ०० -- २३.५५
चांदवड --  १२० --  २५.२ -- ४५.१९
कळवण -- १६३ -- ४४ -- ४४.१२
बागलाण -- ९८.४० -- १० -- ४७.७१
सुरगाणा --  ५५० --  २०६ -- ८५.७७
देवळा  -- १२३ -- २६ -- ३५.५६
निफाड -- ८२.४० -- ३.५ -- १८.७४
सिन्नर  --  १०४ -- ६ -- ४९.३५
येवला  -- ८१ --  १४ -- ६०.३५
एकूण -- ४२२८ -- ७६४ -- ६०.७१

Web Title: Shravan rain will give life to dead crops!