रोमला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पोषण आहार विषयक परिषदेसाठी नांदगावच्या श्रेयाची निवड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

नांदगाव : आजपासून रोमला सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय पोषण आहार विषयक परिषदेसाठी श्रेया दिलीप आढाव या नांदगावकर कन्येची निवड झाली आहे. दोन दिवस होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेतील आहार व पोषण तंत्रज्ञान व त्यातील विज्ञान या अनुषंगाने होणाऱ्या विविध विषयावरील परिसवांदात श्रेया सहभागी होणारी भारतातील एकमेव आहार तज्ज्ञ आहे.

देशातील नामंकित खेळाडूंसाठी न्यूट्रिशन्स विषयक मार्गदर्शक म्हणून काम करणारी श्रेया या परिषदेतील सहभागी एकमेव भारतीय आहेत हे विशेष. श्रेया रेल्वेत स्टेशन प्रबंधक असलेल्या दिलीप आढाव यांची कन्या आहे. जागतिक आहार तज्ज्ञ व वैज्ञानिक जर्नल्सच्या सहकार्याने अन्न व पौष्टिकतेचे महत्व अशा आंतरराष्ट्रीय परिषदेतून नेहमीच अधोरेखित होत असते. एनएसएफटी २०१८ साठी तुर्की,.साऊथ कोरिया,.इटली कोलंबिया बांगलादेश युएसए असे विविध देश सहभागी झालेले आहेत. त्यात जगभरातील आरोग्य विशेषज्ञ,.क्रिएटिव्ह अन्न विशेषज्ञ व औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रातील प्रोफेसर्सस सहभागी झाले असून त्यांना आलेले खाद्य पदार्थ व त्यातील विविध पोषण विषयक पैलू बद्दल आलेले अनुभव व संशोधनाचे निष्कर्ष काढण्याचे काम रोमच्या हिल्टन गार्डन मध्ये होणारी परिषद करणार असल्याची माहिती श्रेया हिने सकाळला परिषदेतून दिली.

श्रेयाचे शिक्षण नाशिकच्या भोसला मध्ये झाले असून नांदगावकर कन्येने शहराचा लौकिक वाढविला अशी भावना वडील दिलीप,.काका मनोहर,.ऍड बाळासाहेब व दत्तू आढाव यांनी व परिवाराने व्यक्त केली. श्रेया देशातील विविध इंग्रजी माध्यमांसाठी आहार व पोषण विषयक दृष्टिकोन संबंधी लेखन करीत असते. तिला आलेल्या आलेल्या अनुभवांवर पुस्तक प्रकाशित करण्याचा श्रेयाचा मानस आहे.

Web Title: shreya from nandgao selected for international nutrition meet roam