कांदा उत्पादकांना फसविणारा श्रीलंकन संशयित गजाआड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

नाशिक -  नाशिक शहरासह जिल्हा व लगतच्या जिल्ह्यांतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल पाऊण कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या परदेशी व्यापाऱ्यास मदुराईच्या (तामिळनाडू) विमानतळावर अटक करण्यात आली. नाशिक आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेने संशयित व्यापारी ससिगरण नागराज (रा. कोलंबो, श्रीलंका) यास तामिळनाडू पोलिसांकडून ताब्यात घेतले असून, त्यास न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता.२०) पोलिस कोठडी सुनावली आहे. 

याप्रकरणी गेल्या वर्षी आडगाव पोलिसांत आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. संशयित विजयकुमार चंद्रशेखर (रा. सेलम, तमिळनाडू), ससिगरण नागराज (रा. कोलंबो, श्रीलंका) यांनी संगनमत करून साई पादुका एक्‍सपोर्ट या नावे फर्म स्थापन केली होती. या फर्ममध्ये संशयित ससिरण नागराज हा भागीदार नसतानाही त्यास भागीदार दाखविण्यात आले होते. या दोघा संशयितांनी नाशिक शहरासह जिल्हा व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कांदा व ज्युट पोती खरेदी करून त्यांची तब्बल ७४ लाख १४ हजार ६८१ रुपयांची फसवणूक केली होती. ससिगरण नागराज याने शेतकरी व व्यापाऱ्यांचे पैसे न देताच श्रीलंकेत पळून गेला होता. गेल्या शनिवारी (ता.१४) संशयित ससिगरण नागराज तामिळनाडूतील मदुराई विमानतळावर अटक करण्यात आली.

Web Title: shrilankan arrested crime