'अयोध्येत श्रीराम मंदिराची वर्षभरात व्हावी उभारणी'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

जळगाव - भारत हा सर्वधर्मसमभाव असलेला देश मानला जातो; परंतु या सर्वधर्मसमभावामुळे देशाचे नुकसान होत आहे. हे होऊ द्यायचे नसेल, तर हिंदू राष्ट्र स्थापन व्हायला हवे. त्यापूर्वी अयोध्येत श्रीरामाचे मंदिर येत्या वर्षभरात स्थापन व्हायला हवे. मंदिर बांधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागत आहे. पण, मंदिर उभारण्यासाठी हिंदूंनी सज्ज व्हावे. अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारणी हे वर्ष संपेपर्यंत करण्याचा हुंकार भाग्यनगरचे आमदार टी. राजासिंह यांनी आजच्या सभेत भरला.

हिंदू जनजागृती समितीतर्फे शहरातील शिवतीर्थ मैदानावर आज हिंदू राष्ट्र जागृती सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. सभेला हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव, हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर उपस्थित होते. सभेला जिल्हाभरातून हिंदू धर्मप्रेमींची उपस्थिती होती. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. क्षिप्रा जुवेकर यांनी समितीच्या कार्याची माहिती दिली.

आमदार राजासिंह म्हणाले, की हिंदू राष्ट्र स्थापन करायचे असेल, तर मातांनी प्रथम संकल्प करा, की आपला मुलगा शिवाजी महाराजांसारखा वीर व्हावा. प्रत्येक माता जिजाऊ आणि झाशीची राणी व्हायला हवी, तरच हिंदू राष्ट्र निर्माण करणे शक्‍य आहे. युवकांनाही वीरयोद्धा व्हावे लागणार आहे. यासाठी संघटन आवश्‍यक आहे. हिंदू या नात्याने प्रथम हिंदू धर्माचे रक्षण करण्याचे आवाहन त्यांनी केले. भारत देश हिंदूंचा ‘हिंदुस्थान’ असून, त्याला इस्लामिक राष्ट्र करण्याचे धर्मांधांचे स्वप्न कदापि साकार होऊ देणार नाही. चित्रपट अभिनेता नसरुद्दीन शाह याने देशात असुरक्षित वातावरण असल्यामुळे देश सोडून जावे, असे म्हटले. देशात गोहत्या वाढली असून, गोमांस निर्यात केले जात आहे. हिंदू तरुणी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. या समस्यांना आळा घालण्यासाठी भारताला हिंदू राष्ट्र करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

दुबळी राज्यव्यवस्था नकोय - इचलकरंजीकर
सर्वोच्च न्यायालयाने मागील आठ वर्षे राममंदिराच्या याचिकेवर सुनावणी घेतली नाही. रस्त्यावरील मंदिरे बेकायदेशीर आहेत. ती पाडण्यास न्यायालय आदेश करते. पण, बेकायदेशीर मशिदी पाडल्या जात नाहीत. असली दुबळी राज्यव्यवस्था नकोय, यासाठीच हिंदू राष्ट्र आवश्‍यक असल्याचे अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी म्हटले. आज ‘सनातन’वर बंदी घालण्याची भाषा होत आहे. पण, पोलिसांना मारणाऱ्या रझा अकादमीविषयी चूप राहतात. एकीकडे संविधानाचा डांगोरा पिटला जातो. हिंदुत्ववादी, भगवा आतंकवाद असा आवाज उठविला जातो; परंतु संविधानात आतापर्यंत १०३ सुधारणा झाल्या आहेत. मग, आम्ही एक पालट केला तर काय बिघडतंय, असा सवाल त्यांनी केला. याशिवाय, सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव व हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनीही मनोगत व्यक्‍त केले.

Web Title: Shriram temple in Ayodhya during the year