थेट घंटागाड्या रोखून नगरसेविका राणेंचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

सिडको - सातत्याने तक्रारी करूनही घंटागाडी ठेकेदार दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या प्रभाग २९ च्या नगरसेविका रत्नमाला राणे यांनी आज प्रभागात फिरणाऱ्या दोन्ही घंटागाड्या अडवून आंदोलन केले. यापुढे घंटागाड्या सुरळीत न झाल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, घंटागाडी ठेकेदाराने प्रभागासाठी एक घंटागाडी वाढवून देण्याचे लेखी लिहून दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

प्रभाग २९ मध्ये काही भागात घंटागाडी फिरत नाही, अशी महिलांची तक्रार होती. त्यामुळे सौ. राणे यांनी संबधितांकडे वारंवार तक्रारीही केल्या होत्या. उत्तमनगर भागात काल (ता. १५) महिला संतप्त झाल्या. महिलांनी पुन्हा तक्रार केल्यामुळे आज सकाळी साडेअकरादरम्यान उत्तमनगर येथे प्रभागात घंटागाड्या आल्या असता सौ. राणे यांनी या दोन्ही गाड्या अडविल्या व चाव्या ताब्यात घेऊन आंदोलन सुरू केले. काही वेळानंतर संबंधित ठेकेदार आले व आंदोलन मागे घ्या, असे सांगून तुमच्यावर गुन्हा दाखल करतो, असा दम दिल्याने तणावात भर पडली. ठेकेदार अंबड पोलिस ठाण्यातही गेला; पण पोलिसांनी अशी तक्रार घेता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर यापुढे असे होणार नाही व प्रभागासाठी एक घंटागाडी नव्याने सुरू केली जाईल, असे लेखी लिहून दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

सोमवार (ता. १८) नंतर घंटागाड्यांबाबत पुन्हा तक्रारी आल्यास शिवसेना स्टाइल आंदोलन केले जाईल, असे सांगून माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल असे सौ. राणे यांनी सांगितले.

घंटागाड्यांवर कारवाई
आंदोलन सुरू असताना पेलिकन पार्क येथे संबंधित ठेकेदाराच्या घंटागाडीतून बाहेरून आलेला डेब्रिज टाकला जात होता. त्या वेळी घंटागाडीचा ट्रॅक्‍टर येथे फसला. त्यामुळे या घटनेचीही चौकशी करण्याची मागणी राणे यांनी महापालिका आयुक्त व महापौरांकडे केली. तक्रारी असलेल्या व दोन्ही घंटागाड्यांवर महापालिकेतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे विभागीय स्वच्छता अधिकारी रमेश गाजरे यांनी सांगितले.

Web Title: sidko nashik news ratnamala rane agitation