सिंहस्थ निधीचे वीस कोटी महापालिकेच्या पदरात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

नाशिक - मार्च महिन्याअखेरीस जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या सिंहस्थ कक्षाचे शटर डाउन होत असल्याने शासनाने महापालिकेला द्यावयाच्या निधीचा हिशेब पूर्ण करण्याकडे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून 67 कोटी रुपये देण्यापैकी वीस कोटी 29 लाख रुपयांचा निधी सरकारने जमा करण्याचे पत्र महापालिकेला दिले. परंतु हा निधी इतरत्र खर्च न करता सिंहस्थाची शिल्लक कामे पूर्ण करण्यास खर्च करावा लागणार आहे. 

सिंहस्थासाठी राज्य शासनाने महापालिकेचा 929 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला होता. त्यातील दोन चतुर्थांश रक्कम शासनाकडून प्राप्त होणार होती. त्यानुसार महापालिकेला सिंहस्थ कामांसाठी 689 कोटी 46 लाख रुपये प्राप्त होणार होते. परंतु सिंहस्थ समाप्ती होऊन दीड वर्ष उलटत आले तरी त्यातील 67 कोटी 42 लाख रुपये शासनाकडून प्राप्त झाले नाहीत. मार्च महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील सिंहस्थ कक्ष बंद केला जाणार असल्याने उर्वरित निधी प्राप्त करून घेण्यासाठी महापालिकेला शासनाचे उंबरठे झिजवावे लागणार असल्याच्या धास्तीने महापालिका प्रशासन चिंतेत होते. परंतु त्यापूर्वीच शासनाने सिंहस्थाचा हिशेब पूर्ण करण्याच्या हिशेबाने आज महापालिकेशी पत्रव्यवहार करून वीस कोटी 29 लाख रुपये देण्याचे पत्र दिल्याने महापालिका प्रशासनाला आर्थिक अडचणीच्या काळात दिलासा मिळाला आहे. उर्वरित निधी लवकर प्राप्त होण्याची अपेक्षा प्रशासनाला आहे. दुसरीकडे बचतीतून शिल्लक राहिलेली रक्कम शासनाने महापालिकेला द्यावी, अशी मागणी आहे, परंतु अद्यापही त्यावर निर्णय झालेला नाही. शासनाने महापालिकेला दिलेला सिंहस्थाचा निधी ज्या बॅंकेत जमा झाला त्याचे तेरा कोटी रुपये व्याजाची शासनाकडून मागणी केली आहे. ती रक्कम शासनाने परत घेऊ नये, अशी मागणी महापालिका प्रशासनाची राहणार आहे. 

Web Title: Simhastha funds