खेड्यात राहणारी मुले आई-वडिलांकडे कधीच दुर्लक्ष करीत नाही: सिंधूताई

Dhule
Dhule

कापडणे : बहिणाबाईंच नाव विद्यापीठाला दिल गेल.ही अभिमानाची बाब आहे. खान्देशी बाई पहाटे उठते. दिवसभर राबते. पारंपारीक साहित्यही जोपासते. चालत रहा. थांबू नका. बायकोच्या थकण्याच कौतुक करा. बाया भांडतात. धमकी देतात. पण त्यांना बोलू नका. खोट खोट बोलत होता. सामोपचाराने जगा. बाया कधीच कमजोर नाहीत. पण मुलींकडे लक्ष द्या.  न सांगता जिला कळत तीच नाव मुलगी असते. बापाची गरीबी झाकण्यासाठी मुलीचा जन्म आहे. देशाची वेदना कमी करण्यासाठी महिलेचा जन्म आहे. नववारीच महाराष्र्टात बेस्ट आहे. खेड्यातील पोर आईबापाला सोडत नाही. शहरात गेलेल्या मुलांचे त्यांच्याकडे दुर्लक्षच होते. असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची आई सिंधूताई सपकाळ यांनी काढलेत.

सिंधूताई सपकाळ यांचे व्याख्यानात्मक कथाकथन येथे झाले. त्यावेळी त्यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. व्यापारी अरुण पाटील, महेश पाटील व विशाल पाटील यांनी व्याख्यान आयोजित केले होते. गटनेते भगवान पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी राष्र्टवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी कृषी सभापती किरण पाटील, माजी नगरसेवक रवीराज भामरे, नवल पाटील, देवीदास खलाणे, साहित्यिक रामदास वाघ, भाजपा कृषी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे, सरपंच भटू पाटील, उपसरपंच कविता पाटील आदी उपस्थित होते.

सिंधूताई म्हणाल्यात, आजची पोर पोरी प्रेमच अधिक करतात. पण सांभाळून रहा. आईवडिलांच्या भावनांना जपा. पत्नीच दुःख समजायला शिका. बाई नाही तर काही नाही. मी जगली तुम्हीही जगा. भाकरीच नात घट्ट असत. त्यामुळे वाईट विचार येत नाही. माफ करायला शिका तरच मोठे व्हाल. दुःखाला शोधा. जे आपल्याला मिळाले नाही. ते दुसर्‍यांना द्या. 

पत्रकारांविषयी अभिमान...
प्रत्येकाला संरक्षण असते. पण पत्रकार  विदाऊट संरक्षण देशाच्या समस्या मांडतात. पोलीस आणि जवानांमुळे देशाची सुरक्षा अबादीत आहे. त्यांच्याविषयी सहानुभूती राहू द्या. अभिमान बाळगा.

दरम्यान व्यापारी अरुण पाटील, लताबाई पाटील व ग्रामपंचायतीतर्फे सिंधूताईंचा नागरिक सन्मान करण्यात आला. यावेळी सात हजारावर ग्रामस्थ उपस्थित होते. जगन्नाथ पाटील यांनी प्रास्ताविक करुन सुत्रसंचलन केले. विजय माळी यांनी आभार मानलेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com