PHOTOS : प्रसिध्द गायिका गीता माळी अपघातात ठार..

पोपट गवांदे,सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

इगतपुरी शहर- नाशिकच्या प्रसिद्ध गायिका गीता माळी मुंबईहून नाशिककडे येत असतांना शहापुर येथे झालेल्या गॅस टँकर क्र. ( MH48 AY 4756 ) व कारच्या ( MH02 DJ 6488 ) धडकेत माळी या गंभीर जखमी होऊन त्या अपघातात जागीच ठार झाल्या.

  हा अपघात गुरुवारी ( ता.१४ ) दुपारी झाला. अपघातात त्यांचे पती विजय माळी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. माळी यांच्या निधनाने नाशिकमधील कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.. 
 गीता माळी गेल्या तीन महिन्यांपासून अमेरिकेत होत्या. मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांचे पती विजय माळी यांच्यासोबत त्या नाशिकला कारने निघाल्या. दुपारी तीनच्या सुमारास त्यांची कार मुंबई आग्रा महामार्गावरील शहापूर परिसरात असलेल्या लाहे फाटानजीक आली असताना रस्त्यावर अचानक कुत्रे आले. या कुत्र्याला वाचविण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गॅस टँकरवर मागुन कार धडकली. या घटनेत माळी यांना गंभीर दुखापत झाली असल्याने तात्काळ त्यांना शहापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र  त्यांचा जागीच मृत्यू झाला. होता. पती विजय हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


अपघाताची दुसरी घटना

दोन दिवसापुर्वीच याच परीसरात महामार्गावरील हॉटेल परिवार गार्डन समोर

 मुंबईहुन नाशिककडे येणाऱ्या एका गॅस टँकरला पाठीमागून आलेल्या भरधाव कार ( क्र. RJ.19.TA.8005 ) ने जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यु झाला होता.माळी दाम्पत्याला झालेल्या अपघाताची ही दुसरी घटना होती.

आठवणींना उजाळा...
२०१७ ऑस्ट्रेलियामधील सिडनी या शहरात वीर सावरकर विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी गायिका गीता माळी यांना गायनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. गीता माळी यांनी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत मजल दरमजल करत त्यांनी नावलौकिक मिळवला होता. त्यांच्या आकस्मित निधनाने कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे. माळी यांच्या अपघाताची माहिती मिळताच सोशल मीडियात अनेकांनी श्रद्धांजली अर्पण करत माळी यांच्या आठवणी शेअर केल्या.

 

 

Image may contain: outdoor

Image may contain: car and outdoor

Image may contain: one or more people and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Singer Geeta mali accident at shahapur Nashik News