भिंगारे येथे बहीण-भावाची आत्महत्या

Sister in law suicide in Bhingare
Sister in law suicide in Bhingare

चिचोंडी : भिंगारे (ता.येवला) येथील चांगदेव लक्ष्मण सोनवणे (वय 56) व इल्ह्याबाई सोनवणे (वय 45) या दोन्ही भाऊ-बहिणीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयित कारणाने पोलिसांनी संतोष चांगदेव सोनवणे यास ताब्यात घेतले आहे. सकाळी सात वाजता ही घटना घडली.

तळ्यात पडून दोघा बहीण भावाचा मृत्यू झाल्याची घटना भिंगारे व परिसरात पसरताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. दरम्यान चांगदेव सोनवणे व त्यांची बहीण इल्ह्याबाई सोनवणे या दोघांनी त्यांच्या शेतातील शेततळ्यामध्ये उडी मारून जीवन संपवले, असे येथील पोलिस पाटील शिवाजी पाटील गाडे यांनी येवला तालुका पोलिसांना दिली. शेततळे पूर्ण भरलेले असल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या सहायाने तळे फोडून पाणी कमी करून स्थानिक पोहणाऱ्यानी दुपारी एक वाजता मृतदेह बाहेर काढले.

येवला तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, पाटील, तांदळकर घटनास्थळी हजर होते. दहा ते बारा एकर जमिनीचे वाद असल्याचे समोर आले असून, जमिनीवर स्टे असल्याने दोन वर्षांपासून जमीन पंडित असल्याने या वादातून आत्महत्या केली की काही घातपात झाला याचा पोलीिस तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com