नाशिकजवळ अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

accident
accident

नाशिक : मनमाड-येवला रस्त्यावर इर्टीगा कार आणि आयशर टेम्पो यांच्यात आज (बुधवार) पहाटे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
मिळालेल्या माहितीनुसार, मनमाड-येवला रस्त्यावरील अनकाई बारी येथे पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. इर्टीगा कार मनमाडहून येवल्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोने इर्टीगा कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात इर्टीगा कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, कारमधील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मृतांमध्ये 3 महिला, 2 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश असून हे सर्व जण एकाच कुटुंबातील आहेत. दरम्यान अपघातानंतर आयशर टेम्पोचा चालक फरार झाला असून मनमाड पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com