येवल्याजवळील अपघातातील मृत कोपरगावचे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

नाशिक : मनमाड-येवला रस्त्यावर इर्टीगा कार आणि आयशर टेम्पो यांच्यात आज (बुधवार) पहाटे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख पटली असून, बाळासाहेब मुरलीधर अनाड (55), श्रीनाथ बाळासाहेब अनाड (22), इंदू बाळासाहेब अनाड (45), मोहिनी खांदवे (30), हरी खांदवे (7) भिमाबाई रोहोकले (आत्या) राहणार इंदोर अशी मृतांची नावे आहेत. कोपरगाव येथील प्रसिद्ध बाबा पान स्टॉलचे बाळासाहेब हे मालक होते

मिळालेल्या माहितीनुसार, मनमाड-येवला रस्त्यावरील अनकाई बारी येथे पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. इर्टीगा कार मनमाडहून येवल्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोने इर्टीगा कारला जोरदार धडक दिली.
 
Web Title: six deadaccident near nashik

टॅग्स