येवल्याजवळ वारकऱ्यांच्या गाडीला अपघात; 6 जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

मालेगाव तालुक्यातील पाळद येथील वारकरी पंढरपूर येथून दर्शन घेऊन घरी परतत होते. पहाटे पाच वाजेच्या सुमारास पिकअप गाडी (एमएच ४,सीपी २४४७) व  मालवाहू ट्रक (केए २५, डी-७८०८) चा आपघात झाला.

येवला : नगर - मनमाड महामार्गावर येवल्याजवळ अंचलगाव पाटीजवळ पिंपळगाव जलाल हद्दीत पंढरपूरवरुन परतणाऱ्या पिक अप गाडीला अपघात झाला. यात पाच ते सहा भाविक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

मालेगाव तालुक्यातील पाळद येथील वारकरी पंढरपूर येथून दर्शन घेऊन घरी परतत होते. पहाटे पाच वाजेच्या सुमारास पिकअप गाडी (एमएच ४,सीपी २४४७) व  मालवाहू ट्रक (केए २५, डी-७८०८) चा आपघात झाला. ट्रकने पिकअपला धडक दिली. पीकअपमध्ये १६ वारकरी होते, त्यांपैंकी ५ ते ६ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six injured in accident in Yeola