महापालिकेत यंदाही सहा प्रभाग समित्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

नाशिक - शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार नगरसेवकांना जलदगतीने विकासकामे करता यावीत, यासाठी नऊ प्रभाग समित्या स्थापन करण्यास वाव आहे; पण वाढलेला आस्थापना खर्च व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे यंदाही नऊऐवजी सहा प्रभाग समित्या स्थापन करण्याची शिफारस महापालिका प्रशासनाने महासभेला केली आहे. 

महापालिका अधिनियमानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागरचना करण्याची सूट महापालिका प्रशासनाला देण्यात आली आहे. शहरातील 2011 च्या जनगणनेनुसार 14 लाख 86 हजार 53 इतकी लोकसंख्या आहे. 12 ते 24 लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकांना नऊ प्रभाग समित्या स्थापन करण्याची मुभा आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात सध्या पूर्व, पश्‍चिम, नाशिक रोड, सातपूर, सिडको व पंचवटी अशा सहा प्रभाग समित्या आहेत. त्यात आणखी तीन प्रभाग समित्या अस्तित्वात आणणे शक्‍य आहे. परंतु, प्रशासनाने तयार केलेल्या अहवालानुसार तीन समित्या रद्द करून फक्त सहा प्रभाग समित्या स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. म्हणजेच पूर्वी अस्तित्वात असलेल्या प्रभाग समित्याच कार्यरत ठेवण्याचा प्रस्ताव महासभेला सादर करण्यात आला आहे. 

प्रस्तावानुसार प्रभागांचे नियोजन, कंसात नगरसेवक 
पंचवटी विभाग- 1 ते 6 (24) 
पश्‍चिम विभाग- 7, 12, 13 (12) 
पूर्व विभाग- 14, 15, 16, 23, 30 (19) 
नाशिक रोड विभाग- 17 ते 22 (23) 
सातपूर- 8 ते अकरा व 26 (20) 
सिडको- 24, 25, 27, 28, 29, 31 (24) 

Web Title: Six Ward Committees Municipal this year