VIDEO : दोन तासांचा थरार..बोअरमध्ये मृत्यूशी झुंज देत होता चिमुकला...

रविंद्र पगार : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

गुरुवारी (ता.१४) सकाळी ९ वाजता रितेश बोअरवेलमध्ये पडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने बोरवेलच्या बाजूने खोदकाम केले गेले. त्यानंतर त्याच्या सुटकेसाठी पोलिसांसह महसूल टीमही प्रयत्न करत होती. तहसीलदार, पोलिसांनीही या मुलाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.रितेश हा मूळचा मध्यप्रदेश येथील शेंधवा रहिवाशी असून त्याचे आई-वडील शेत मजूर आहे कळवण शेतीकामासाठी आले होते. काम करत असताना रितेश आसपासच्या परिसरात खेळत होता. याच ठिकाणी तो खेळता-खेळता बोरवेलमध्ये पडला. त्याच्या आई-वडिलांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी मदतीसाठी धावाधाव केली. त्यानंतर मग रितेशच्या बचावासाठी प्रयत्न सुरू झाली. आता अखेर २ तासानंतर बचावकार्य पूर्ण झाले आहे

नाशिक : कळवण तालुक्यातील बेज शिवारातील बोअरमध्ये सहा वर्षांच्या रितेश जवंशिग सोळंकी बोअरवेलमध्ये पडला. ही बोअरवेल २०० फूट खोल असून सुदैवाने हा मुलगा अंदाजे 50 फूट खोलीवर अडकला होता. त्यानंतर त्याच्या सुटकेसाठी पोलिसांची टीमही प्रयत्न करत होती. अखेर दोन तासानंतर प्रयत्नाने आज (ता.१४) महसूल पोलीस यंत्रणांच्या अथक प्रयत्नांमुळे रितेशला दोन तासांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. 

 

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात गुरुवारी सकाळी ९ वाजता रितेश बोअरवेलमध्ये पडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने बोरवेलच्या बाजूने खोदकाम केले गेले. त्यानंतर त्याच्या सुटकेसाठी पोलिसांसह महसूल टीमही प्रयत्न करत होती.

Image may contain: one or more people, sky and outdoor

तहसीलदार, पोलिसांनीही या मुलाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.रितेश हा मूळचा मध्यप्रदेश येथील शेंधवा रहिवाशी असून त्याचे आई-वडील शेत मजूर आहे. कळवण शेतीकामासाठी आले होते. काम करत असताना रितेश आसपासच्या परिसरात खेळत होता. याच ठिकाणी तो खेळता-खेळता बोरवेलमध्ये पडला.

Image may contain: 4 people, people standing, tree, outdoor and nature

त्याच्या आई-वडिलांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी मदतीसाठी धावाधाव केली. त्यानंतर मग रितेशच्या बचावासाठी प्रयत्न सुरू झाली. आता अखेर २ तासानंतर बचावकार्य पूर्ण झाले आहे.

Image may contain: 4 people, including Jayesh Anant Tare, people smiling, people sitting, child and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six years old boy was struggling with death in well Nashik News