प्रवाशांनो! 'या' चार रेल्वेगाड्यांना आता अतिरिक्त स्लीपर क्‍लास कोचची सोय 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

मध्य रेल्वेने चार प्रमुख रेल्वेगाड्यांना अतिरिक्त स्लीपर कोच लावण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी (15065 / 15066) अपडाउन गाडीला तीन अतिरिक्त स्लीपर क्‍लास कोच लावण्यात येत आहेत, गाडी (15065) अप गोरखपूर-पनवेल एक्‍स्प्रेसला शुक्रवार (ता.22)पासून तीन अतिरिक्त स्लीपर क्‍लास कोच लावले आहेत. गाडी (15066) डाउन पनवेल गोरखपूर एक्‍स्प्रेसला शनिवारी (ता. 23) पनवेल स्थानकातून गाडीला तीन अतिरिक्त स्लीपर क्‍लास कोच लावले आहेत.

नाशिक : मध्य रेल्वेने चार प्रमुख रेल्वेगाड्यांना अतिरिक्त स्लीपर कोच लावण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी (15065 / 15066) अपडाउन गाडीला तीन अतिरिक्त स्लीपर क्‍लास कोच लावण्यात येत आहेत, गाडी (15065) अप गोरखपूर-पनवेल एक्‍स्प्रेसला शुक्रवार (ता.22)पासून तीन अतिरिक्त स्लीपर क्‍लास कोच लावले आहेत. गाडी (15066) डाउन पनवेल गोरखपूर एक्‍स्प्रेसला शनिवारी (ता. 23) पनवेल स्थानकातून गाडीला तीन अतिरिक्त स्लीपर क्‍लास कोच लावले आहेत.

तीन अतिरिक्त स्लीपर क्‍लास कोच

गाडी (15067 / 15068) अपडाउन या दोन्ही रेल्वेगाड्यांना तीन अतिरिक्त स्लीपर क्‍लास कोच लावले जातील. गाडी (15067) अप गोरखपूर-बांद्रा टर्मिनस एक्‍स्प्रेसला येत्या बुधवार (ता.4)पासून गोरखपूर स्थानकातून तीन अतिरिक्त स्लीपर क्‍लास लावले जाणार आहेत. गाडी (15068) डाउन बांद्रा टर्मिनस-गोरखपूर एक्‍स्प्रेस शुक्रवारी (ता. 6) बांद्रे स्थानकातून सुटताना स्थानकात तीन अतिरिक्त स्लीपर क्‍लास कोच लावले जातील. रेल्वेगाडी (15063 / 15064) अपडाउन गाड्यांना तीन अतिरिक्त स्लीपर क्‍लास लावले जातील. गाडी (15063) अप गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनस या गाडीला बुधवारी (ता.2) गोरखपूर स्थानकातून तीन अतिरिक्त स्लीपर क्‍लास कोच लावले जातील. गाडी (15064) डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर गाडीला गुरुवारी (ता. 3) निघताना स्थानकातून तीन अतिरिक्त स्लीपर क्‍लास कोच लावले जातील.

 हेही वाचा >  सत्तेच्या डावपेचात पोलिसांच्या सुट्या रद्द 

अतिरिक्त वातानुकूलित तृतीय श्रेणी कोचदेखील

गाडी (15018 / 15017) अपडाउन गाडीला एक अतिरिक्त वातानुकूलित तृतीय श्रेणी कोच लावला जाईल. गाडी (15018) अप गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस काशी एक्‍स्प्रेसला बुधवारी (ता.27) एक अतिरिक्त वातानुकूलित तृतीय श्रेणी कोच लावला जाईल. गाडी (15017) डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर काशी एक्‍स्प्रेसला शुक्रवारी (ता.29) एक अतिरिक्त वातानुकूलित तृतीय श्रेणी कोच लावला जाणार आहे. 

हेही वाचा > शरद पवारांकडे परतलेल्या आमदारांच्या 'या' विधानांमुळे गोंधळात भर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sleeper class coaches in the Railway Nashik Marathi News