नाशिककरांनो, स्मार्ट रोडची प्रतिक्षा संपली...कारण

smart road.jpg
smart road.jpg

नाशिक : एखादे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा पूर्णत्वाचा दाखला मिळाल्याशिवाय ते काम पूर्ण झाल्याचे घोषित करणे नियमबाह्य असतानाही स्मार्टसिटी कंपनीने अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाकादरम्यानचा वादग्रस्त स्मार्ट रोड पूर्ण झाल्याचे दर्शवून 26 जानेवारीपासून रस्ता खुला करण्याचा परस्पर निर्णय घेतला आहे. त्यामुळे दररोज दंड भरणाऱ्या ठेकेदारासाठी स्मार्टसिटी काम करते की नाशिककरांसाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

17.41 कोटींचा खर्च 21 कोटींपर्यंत वाढला

स्मार्टसिटी कंपनीतर्फे अशोक स्तंभ ते त्र्यंबक रोडदरम्यान 1.1 किलोमीटर स्मार्ट रस्त्याचे काम पावणेदोन वर्षांपासून सुरू आहे. रस्ता पूर्ण करण्याची मुदत सहा महिन्यांची होती; परंतु सी-फोर कंपनीला काम पूर्ण करता आले नाही. कामाच्या दिरंगाईमुळे नाशिककर मेटाकुटीला आले. याविरोधात व्यापारी व विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले. रस्त्याविरोधात संताप वाढत असताना स्मार्टसिटी कंपनीने संबंधित ठेकेदाराच्या वाढीव प्रस्तावाला मंजुरी दिल्याने 17.41 कोटींचा खर्च 21 कोटींपर्यंत पोचला. मार्च 2018 मध्ये काम सुरू झाले. 

डेडलाइन पाळता न आल्याने रखडले काम

पहिल्या सहा महिन्यांत 100 टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित असताना अवघे 15 टक्के काम झाले. त्यामुळे सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्या मुदतीतही रस्ता पूर्ण झाला नाही. मार्च 2019 पर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. ती डेडलाइन पाळता आली नाही. त्यानंतर एप्रिल 2019 पासून 41 हजार रुपये प्रतिदिन याप्रमाणे दंडआकारणी सुरू झाली. अखेरीस 26 जानेवारी 2020 ही अंतिम मुदत ठेकेदाराला दिली होती. त्यानुसार प्रजासत्ताक दिनापासून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे स्मार्टसिटी कंपनीने जाहीर केले. 

करारानुसार स्मार्ट रोड अपूर्णच 

कराराप्रमाणे रस्ता संपूर्ण तयार होऊन कंपनीकडे हस्तांतरित होणे अपेक्षित आहे. स्मार्ट रोड म्हणजे कॉंक्रिटचा रस्ता तयार करणे नव्हे. करारानुसार स्मार्ट रोडवर 27 सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, पब्लिक ऍड्रेस सिस्टिम, एन्व्हायर्न्मेंट सेंसर्स बसविणे, पथदीप, सायकल ट्रॅक, ई-टॉयलेट बसविणे, किऑक्‍स यंत्रणा उभी करणे, आधुनिक बसस्थानके, आसनव्यवस्था आदी सुविधा पुरविणे बंधनकारक असताना रस्ता तयार झाल्याचे दाखवून खुला करण्याचे जाहीर करण्यात आले.

सकारात्मक अहवाल प्राप्त झाल्यानंतरच रस्ता खुला

शनिवारी (ता. 25) रस्त्याच्या दोन चाचण्या घेतल्या जाणार आहेत. दुसऱ्या चाचणीत रस्त्याची स्ट्रेन्थ तपासली जाणार आहे. सकारात्मक अहवाल प्राप्त झाल्यानंतरच रस्ता खुला होणार असल्याचे तांत्रिक बाबी पाहणाऱ्या अधिकऱ्यांनी माहिती दिली.  
हेही वाचा>नाशिककर म्हणताय...''फुल खिले है गुलशन गुलशन''... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com