स्मार्ट महिलांचे मार्केटिंगही झाले स्मार्ट 

धनश्री बागूल - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

जळगाव - सध्याच्या या तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच क्षेत्रांत "स्मार्टनेस' आला आहे. यात पुरुषांप्रमाणेच महिलांनीही समाजात आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. आता महिलाही व्यवसाय क्षेत्रात पुढे आल्या आहेत. यात त्या आपल्या मालाची मार्केटिंग करण्यासाठी विविध पद्धतीचा वापर करत आहेत. यात अधिकतर महिला सोशल मीडियावर आपली मालाची माहिती अपलोड करत स्मार्ट "मार्केटिंग' करत आहेत. 

जळगाव - सध्याच्या या तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच क्षेत्रांत "स्मार्टनेस' आला आहे. यात पुरुषांप्रमाणेच महिलांनीही समाजात आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. आता महिलाही व्यवसाय क्षेत्रात पुढे आल्या आहेत. यात त्या आपल्या मालाची मार्केटिंग करण्यासाठी विविध पद्धतीचा वापर करत आहेत. यात अधिकतर महिला सोशल मीडियावर आपली मालाची माहिती अपलोड करत स्मार्ट "मार्केटिंग' करत आहेत. 

आजकाल प्रत्येक महिला ही काही ना काही उद्योग करत आहे. आपले काम स्मार्ट कसे करता येईल यासाठी महिला विविध पद्धतींचा वापर करत असतात. मात्र सध्या महिलांचा सोशल मीडियावरील स्मार्ट मार्केटिंग याकडे कल वाढला आहे. कपडे, ज्वेलरी, कॉस्मेटिक्‍स, पर्स यांसारख्या वस्तू महिलांना आकर्षित करत असल्याने या वस्तूंचे व्यवसाय अधिकतर महिला करतात. आपला माल मागविण्या पूर्वीच महिला या मालाचे फोटो ग्रुपवर टाकत असल्याने त्या महिला त्या मालाची बुकिंग करून ठेवतात. यामुळे माल आल्यानंतर तो एका आठवड्यात संपतो. याप्रकारे महिला "स्मार्टली' व्यवसाय करताना दिसून येत आहे. 

व्हॉट्‌सऍप ग्रुप 
सध्या व्यावसायिक महिलांनी मार्केटिंग करण्यासाठी व्हॉट्‌सऍपचा वापर सुरू केला आहे. यासाठी या महिलांनी काही व्हॉटस्‌ऍप ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून त्या महिलांना आपल्या मालाबद्दल विविध प्रकारची माहिती देत असतात. महिला या आपल्या मालाचे फोटो अपलोड करत त्यांना त्या वस्तूची किंमतही ग्रुपवरच सांगत असतात. त्यामुळे महिलांना नवीन फॅशनची माहिती मिळण्यास सुलभ होते. 

वेळेची बचत 
"स्मार्ट मार्केटिंग'मुळे व्यावसायिक व ग्राहक या दोघांच्या वेळेचे बचत होत आहे. एकाच वेळी व्हॉट्‌स ऍप ग्रुप अथवा फेसबुकवर आपल्या मालासंबंधी पोस्ट टाकली तर अनेक महिलांना समजते त्यामुळे प्रत्येकाला स्वतंत्र सांगण्याची गरज भासत नाही. तसेच ज्यांना त्या वस्तू आवडल्या असतात त्या महिला दुकानात आल्यावर आपल्या स्मार्ट फोनमधील ती इमेज दाखवत त्याची खरेदी करतात. त्यामुळे ही मार्केटिंग अधिकच उपयुक्त ठरत आहे. 

मी गेल्या काही वर्षांपासून कॉस्मेटिक्‍स व ज्वेलरी विक्री करत आहे. माझे दुकान घरीच असल्याने मी या उत्पादनांची माहिती देण्यासाठी व्हॉट्‌सऍपचा वापर करते. यातून मी अनेक ग्राहक जोडले आहेत. 
- तृप्ती पोतदार (व्यावसायिक) 

आजकाल सर्वच महिला स्मार्टफोन वापरतात. त्यामुळे मी नवीन आलेल्या मालाची माहिती ही व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचविण्याचे काम करते. यामुळे माझ्या वेळेची बचत होते, सोबतच ग्राहक वर्गही वाढण्यास मदत होते. 
- कल्पना नहाटा (व्यावसायिक) 

Web Title: Smart women were smart marketing