स्मार्टसिटीसाठी चला करू स्वच्छता - तुकाराम मुंढे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

नाशिक रोड - शहर स्वच्छ राहिले तर आपले आरोग्य चांगले राहील. स्वच्छतेला स्वतःपासून सुरवात करा. कचऱ्याचे ओला व सुका असे विलगीकरण करा. कचरा कमी झाला तर शहरात स्वच्छता राहील.

प्लॅस्टिकचा वापर टाळा. बाजारातून वस्तू खरेदी करताना कापडी पिशवीचा वापर करा. प्लॅस्टिकबंदी व दंड वसूल करून चालणार नाही. त्यासाठी आपण वापर केला नाही तर आपोआपच प्लॅस्टिक बंद होईल. शहर स्मार्टसिटी होण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्‍यक आहे, असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (ता. २६) सांगत सृजन नागरिक म्हणून शहराचा विकास करण्यासाठी हातभार लावावा, तसेच स्वयंशिस्तीस प्राधान्य द्यावे, असे सांगितले.

नाशिक रोड येथील महापालिका शाळा क्रमांक १२५ मैदानाच्या जॉगिंग ट्रॅकवर ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम शनिवारी (ता. २६) राबविण्यात आला. त्या वेळी नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. या उपक्रमात मांडलेल्या काही तक्रारींचे मुंढे यांनी त्वरित निराकरण केले. संबंधित खातेप्रमुखांना ते प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्याचे सूचित केले. या ठिकाणी एकूण १३० टोकनद्वारे तक्रारी प्राप्त झाल्या.

स्थानिक प्रश्‍नांचा ऊहापोह
टोकनद्वारे मांडलेल्या तक्रारीत गायखे कॉलनीतील उद्यानाची दुरवस्था आहे, मोकळ्या जागेत जिम करावे, रस्त्यावर अनधिकृत भाजीविक्रेते बसले; ते अतिक्रमण काढावे, बिटको हॉस्पिटलमध्ये औषधसाठा नाही, परिसरातील रस्त्यांवर कॅमेरे बसवावेत, झेब्रापट्टे मारावेत, गावठाणातील अतिक्रमण काढावे, व्यवसायासाठी गाळे उपलब्ध करून द्यावेत, मयूर कॉलनीत ड्रेनेज चोकअप आहे, उड्डाणपुलाखालील पावसाळी गटारीचे पाण्याची समस्या आहे, नाल्यावर दुकानांचे अतिक्रमण, हॉकर्स व पार्किंग झोन  करावेत, खासगी जागेतील अतिक्रमण काढावे, नाल्यावर दुकानांचे अतिक्रमण आहे ते काढावे, टाउन हॉल सुरू करावा व अल्पदरात वापरासाठी मिळावे आदींचा समावेश होता. मुंढे यांनी समर्पक उत्तरे देऊन नागरिकांचे समाधान केले. काही समस्या जागेवरच सोडविण्यात आल्या.

आश्‍वासन अन्‌ अधिकारी धारेवर 
या परिसरातील म्हशींचा गोठा पाहून श्री. मुंढे संतापले. त्यांनी मालकास दोन तासांत गोठा हलविण्याची सूचना केली. त्यानुसार गोठा हलविण्यात आला. गवळीवाडा येथील अभ्यासिकेची त्यांनी पाहणी केली. तेथे एका कुटुंबाचे वास्तव्य असल्याचे दिसले. कुटुंबाला दोन दिवसांत स्थलांतरित होण्यासाठी मुदत दिली. अभ्यासिका आठवडाभरात सुरू करण्याचा आदेश दिला. 

पार्किंग झोनवरच वाहने हवीत उभी
रस्त्यावर वाहने उभी न करता पार्किंग झोनवर उभी करा. बिल्डिंगच्या पार्किंगच्या जागेत अतिक्रमण असेल ते त्वरित हटवा. हातगाडी रस्त्यावर न लावता हॉकर्स झोनच्या ठिकाणी लावा. अनधिकृत हातगाड्यांवर खरेदी करणे नागरिकांनीच टाळावे, असे आवाहन श्री. मुंढे यांनी केले. आपण स्वतः अतिक्रमण न करता नियमानुसार व प्लॅननुसार बांधकाम करा म्हणजे कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, असे सांगितले.

Web Title: smartcity cleaning tukaram munde