पोत्यात बांधून दहा साप कचऱ्यात फेकले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

बहिणाबाई उद्यानालगत असलेल्या कचरा डम्पिंग जागेवर दररोज घंटागाड्या एकत्रित थांबत असतात. या ठिकाणी काही कचरा वेचणारी मुले प्लॅस्टिक व इतर साहित्य गोळा करतात. आज दुपारी बाराच्या सुमारास एक तरुण प्लॅस्टिक गोळा करत असताना त्याची नजर एका पोत्यावर गेली; दोरीने बांधलेले पोते त्यात काहीतरी मिळेल म्हणून पोते नाल्यातून रस्त्यावर काढले उघडले तर त्यात प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये एक दोन नव्हे, तर तब्बल १० जिवंत साप असल्याचे निदर्शनास आले.

जळगाव - बहिणाबाई उद्यानालगत असलेल्या कचरा डम्पिंग जागेवर दररोज घंटागाड्या एकत्रित थांबत असतात. या ठिकाणी काही कचरा वेचणारी मुले प्लॅस्टिक व इतर साहित्य गोळा करतात. आज दुपारी बाराच्या सुमारास एक तरुण प्लॅस्टिक गोळा करत असताना त्याची नजर एका पोत्यावर गेली; दोरीने बांधलेले पोते त्यात काहीतरी मिळेल म्हणून पोते नाल्यातून रस्त्यावर काढले उघडले तर त्यात प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये एक दोन नव्हे, तर तब्बल १० जिवंत साप असल्याचे निदर्शनास आले. 

बहिणाबाई उद्यानाजवळील नाल्यात पोत्यामध्ये बरण्यांमध्ये साप बांधून फेकल्याचे आढळून आले. हे साप पाहून घाबरून गेलेला मुलगा बाहेर आला. संबंधित पोत्याची पाहणी केली असता, बरण्यांमध्ये भरलेले दोन भारतीय नाग, तीन मण्यार, तस्कर, डुरक्‍या घोणस, धामण, दिवड, कवड्या असे १० साप अतिशय वाईट परिस्थितीत होते. वनविभागाच्या वनरक्षक अश्विनी ठाकरे यांनी घटनास्थळी येऊन उपस्थितांचा जाबजबाब घेऊन पंचनामा केला. यानंतर वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांना घेऊन सर्व सर्प सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Snake receive in garbage