सोशल मीडियावर रंगले घडवणारं आणि बिघडवणारं राजकारण

संतोष विंचू
सोमवार, 21 मे 2018

येवला - किस्मत हो तो देवेगौड़ा परिवार जैसी.. बाप बिना बहुमत के प्रधानमंत्री बना था..तो बेटा बिना बहुमत के मुख्यमंत्री बनेगा...सोशल मीडियावर कर्नाटकच्या प्रार्श्वभूमिवर यासारख्या राजकारण घडवणाऱ्या आणि बिघडवणाऱ्या मिमिकच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे दोन दिवसांपासून नेटीझनची चंगलीच करमणूक सुरु आहे. विशेष म्हणजे घडामोडी थांबल्या पण सोशल मीडिया मात्र अजूनही जोशात आहे.

येवला - किस्मत हो तो देवेगौड़ा परिवार जैसी.. बाप बिना बहुमत के प्रधानमंत्री बना था..तो बेटा बिना बहुमत के मुख्यमंत्री बनेगा...सोशल मीडियावर कर्नाटकच्या प्रार्श्वभूमिवर यासारख्या राजकारण घडवणाऱ्या आणि बिघडवणाऱ्या मिमिकच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे दोन दिवसांपासून नेटीझनची चंगलीच करमणूक सुरु आहे. विशेष म्हणजे घडामोडी थांबल्या पण सोशल मीडिया मात्र अजूनही जोशात आहे.

राजकीय नाट्यानंतर कर्नाटकमध्ये बहुमत सिद्ध करता न आल्याने येडियुरप्पा यांना अवघ्या काही तासांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. याचे पडसाद सर्वसामान्यांच्या बोलक्या प्रतिक्रियांतून उमटत असून, भक्त काँग्रेस विरोधी तर विरोधक मात्र भाजपावर टीका टिप्पणी करत आहेत. भाजपाला सत्ता स्थापनेला निमंत्रण दिल्यावर, मुख्यमंत्री होणे खूप सोपं आहे, फक्त राज्यपाल ओळखीचा पाहिजे..ही मिश्किली सर्वत्र फिरली. मात्र, बहुमत शिद्ध करण्यापूर्वीच राजिनामा दिल्याने, येडीयुरप्पा..अनिल कपूर नंतर सगळ्यात कमी दिवस राहिलेले मुख्यमंत्री यासह दीड दिवसाचा गणपती माहित आहे. पण दीड दिवसाचा मुख्यमंत्री पहिल्यांदा पहिला या प्रतिक्रिया आल्या.

राजकारणी लोक जनतेत भांडणं लावतात, हे नेहेमीचच आहे पण कर्नाटकच्या जनतेने राजकारण्यांमध्ये भांडणं लावली. यासह भल्लादेव को सत्ता मिलने के बाद बाहुबली ख़त्म नहीं हुई थी, पार्ट २ भी आया था...या ट्रोलने राजकारणाचे बदलते रंग प्रतिबिंबित केले.  

शेतकरी पुत्रही यात मागे कसे राहतील, हाता तोंडाशी आलेलं पिक वाया गेल्यावर शेतकऱ्याला कस वाटत असेल? हे आता भाजपला कळलं असेल असा टोला लावत नेटीझन्सनी आपली नाराजी व्यक्त केली. या घटनेत आरक्षणापासून दुर्लक्षित घटकही उतरले...आज मोदीजींना कळेल ओपन कॅटेगरी वाल्यांचं दुःख..कसं वाटतं जेंव्हा जास्त मार्क्स असून सुद्धा नोकरी मिळत नाही... कर्नाटकात आरक्षण लागू १०४ वाले नापास आणि ७८ व ३८ वाल्यांना जॉब या शब्दात आपली व्यथा नेटीझन्सनी मांडली. अभिनंदन भारतीयांनो, कर्नाटक मध्ये काँग्रेस आणि जेडीएसची सरकार बनताच, इव्हिएम ठीक, सर्वोच्च न्यायालय ठीक, लोकतंत्र शाबुत, देशात कुठेही अराजकता नाही, भारत एकदम सहिष्णू आणि धर्मनिरपेक्ष देश बनला अशी टिप्पणी करत या सगळ्यांवर भक्तांनी कडी केली. 

याउलट चिकित्सक नागरिकांनी मात्र मार्मिकपणे मिश्किली करत, माझा मागील तीन ते चार वर्षाचा व्हॉटसअॅप्पचा अनुभव सांगतो..मोदींच्या विरोधात लिहण्याचा प्रयत्न बऱ्याच जणांनी केला, परंतु राहुल गांधींची स्तुती करण्याचे धाडस अजून तरी कोणी दाखवु शकले नाही असा टोला मारला. काहींनी तर भावी मुख्यमंत्री कुमारास्वामी यांचा कुटुंबासोबतचे फोटोही शेअर केले. अर्थबोध काहीही असो पण हे सगळे संदेश मात्र सोशल वाचकांचे चांगलीच करमणूक करत आहेत.

Web Title: The social media can be painted and spoiled politics