दिपावलीची पहिली पणती..आदिवासी चिमुकल्यांच्या संगती..

विजय पगारे : सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

दिपावलीची पहिली पणती आदिवासी चिमुकल्यांच्या संगती या उपक्रमांतर्गत सोशल फोरमचे सदस्य गेल्या १० वर्षांपासून आदिवासी पाड्यातील मुलांना शैक्षणिकी साहित्य आणि मिठाई देऊन साजरी करतात. या प्रथेप्रमाणे यावर्षी आळंदपाडा, फणसपाडा, दुगाचीवाडी या तीन पाड्यांतील सर्व दिडशे कुटुंबांना नवीन ब्लँकेट्स, मिठाई, फरसाण देण्यात आले. या पाड्यातील शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यही देण्यात आले.

नाशिक  : घराघरात दीपावली साजरी करण्याची लगबग चालू असताना सोशल नेटवर्किंग फोरमच्या सदस्यांनी मात्र स्वतःच्या घराऐवजी आदिवासी पाड्यांमध्ये "शैक्षणिक दिपावली" साजरी करण्यात आली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाड्यात शैक्षणिक दीपोत्सव साजरा

दिपावलीची पहिली पणती आदिवासी चिमुकल्यांच्या संगती या उपक्रमांतर्गत फोरमचे सदस्य गेल्या १० वर्षांपासून आदिवासी पाड्यातील मुलांना शैक्षणिकी साहित्य आणि मिठाई देऊन साजरी करतात. या प्रथेप्रमाणे यावर्षी आळंदपाडा, फणसपाडा, दुगाचीवाडी या तीन पाड्यांतील सर्व दिडशे कुटुंबांना नवीन ब्लँकेट्स, मिठाई, फरसाण देण्यात आले. या पाड्यातील दोन शाळातील प्रत्येक विद्यार्थ्याला वह्या, पेन, पेन्सिल्स, ड्रॉईंग बुक्स, स्केच पेन्स, कलर बॉक्स, ब्रश इत्यादी शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.याशिवाय दोनही शाळांना गोष्टींची आणि अवांतर वाचनाची पुस्तकंही भेट दिली गेली.

आदिवासी चिमुकल्यांसोबत दिपोत्सव
 मागील आठवड्यात आपली दीपावली सुरु करण्यापूर्वी आपण काही आदिवासी पाड्यातील मुलांना शैक्षणिक साहित्य भेट द्या असे फेसबुक आणि व्हॅट्सऍपवर आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला संपूर्ण राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला आणि तीन पाड्यांना देऊन पुरेल इतके शैक्षणिक साहित्य,फराळाचे पदार्थ आणि कपडे फोरमच्या कार्यालयात जमा झाले.या सर्व साहित्याचे वाटप तीनही पाड्यांवर करण्यात आले.उर्वरित साहित्यही लवकरच इतर पाड्यांवर वितरित करण्यात येणार आहे.

 

Image may contain: 4 people, people standing, people on stage and outdoor

कार्यक्रमास जीवन सोनवणे, विजया सोनवणे, प्रा.सुमती पवार,डॉ.विशाल पवार, प्रणोती कवडे, प्रतीक्षा सिदीड, प्रा,आशिष चौरसिया, गिरीश परांडकर, प्रमोद गायकवाड, रामदास शिंदे, पर्यवेक्षिका एस व्ही सोनवणे, सरपंच वाळू पारधी, सदू झोले, अशोक पारधी, शिक्षक मार्कंड जाध्य यांच्यासह अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, विद्यार्थी  उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. पंकज भदाणे, प्रशांत बच्छाव,संदीप डगळे,अनिल बस्ते,वसंत मोंढे, अविनाश पारधी,अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले 

शैक्षणिक दीपावलीचे देणगीदार असे

: जीवन सोनवणे,नरेश शहा,समर्थ डायग्नॉस्टिक्स, डाॅ.पल्लवी चव्हाण,प्रसाद देशमुख,राजेंद्र देशमुख,विपुल वसंतराव, डाॅ.योगेश गोसावी, डाॅ.विद्या गोसावी, डाॅ.प्रमोद पाटिल,डाॅ.वैभव पाटिल,दिनेश जोशी, डाॅ.दिनेश पाटिल,डाॅ. आशिष चौरसीया,गिरीश परांडकर,डाॅ. विशाल पवार,डाॅ.मनिषा भुतडा,प्रणोती कवडे ,श्रीकांत गांगूर्डे,तुषार दोषी,राजेश जाधव,विनय हिंगे, डॉ.सीकलीकर, सिकलीकर हाॅस्पीटल,बाळासाहेब सोनवणे आदी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social networking forum celebrates Diwali in tribal area