सार्वजनिक नळ बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

नाशिक - शहरातील गावठाणासह झोपडपट्टी भागात महापालिकेतर्फे पुरविण्यात आलेले सार्वजनिक नळ आता बंद होणार आहेत. त्याऐवजी व्यक्तिगत किंवा सामूहिक पद्धतीने नळजोडणी दिली जाणार आहे. त्यावर किमान पाणीपट्टी आकारली जाईल. पाण्याची गळती थांबविण्यासह उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत लवकरच त्याची अंमलबजावणी होईल.

नाशिक - शहरातील गावठाणासह झोपडपट्टी भागात महापालिकेतर्फे पुरविण्यात आलेले सार्वजनिक नळ आता बंद होणार आहेत. त्याऐवजी व्यक्तिगत किंवा सामूहिक पद्धतीने नळजोडणी दिली जाणार आहे. त्यावर किमान पाणीपट्टी आकारली जाईल. पाण्याची गळती थांबविण्यासह उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत लवकरच त्याची अंमलबजावणी होईल.

महापालिकेने दोन वर्षांपूर्वी शहरात पाणीपुरवठ्याचे सर्व्हेक्षण केले आहे. सर्व्हेक्षणात गंगापूर धरण व दारणा पंपिंग स्टेशन येथून पाणी उचलण्यापासून ते ग्राहकांच्या घरापर्यंत पोचवताना त्यात सुमारे ४४ टक्के पाणीगळती आढळली. ग्राहकांना होणारा पाणीपुरवठा व त्यातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा विचार करता पाणीयोजनांवर होणारा खर्चदेखील त्यातून निघत नसल्याचे सर्व्हेक्षणातून आढळले. त्यामुळेच पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला होता. धरणातून सुमारे ४०० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. ग्राहकांपर्यंत यातील शंभर टक्के पाणी पोचत नसल्याने गळतीचा शोध घेण्यात आला. गळतीत सार्वजनिक ठिकाणी होणारा पाणीपुरवठ्याचा हिशेब नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे महापालिकेने सार्वजनिक नळांच्या माध्यमातून होणाऱ्या पाण्याचा हिशेब लावण्यासाठी सार्वजनिक नळांना मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

कागदपत्रांची अडचण
 शहरात सुमारे ५२५ सार्वजनिक नळांची संख्या
 झोपडपट्टी भागात सर्वाधिक सार्वजनिक नळजोडण्या
 झोपडपट्टी भागात होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा हिशेब जुळविण्यासाठी मीटर
 प्रशासनासमोर कागदपत्रांची अडचण
 झोपडपट्टी भागातील नागरिकांकडे पुरेशी कागदपत्रे नाहीत

वैयक्तिक, सामूहिक जोडीला प्राधान्य 
प्रत्येकाला नळकनेक्‍शन दिले जाणार आहे, पण त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. त्याव्यतिरिक्त चार ते पाच व्यक्ती मिळून सामूहिक जोडणी दिली जाईल. आता शहरातील वाडे, झोपडपट्टी, नव नगरांत बसविण्यात आलेले सार्वजनिक नळ बंद होतील. नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक नळ आहेत. तेथे मोफत पाणीपुरवठा होतो. ज्या लोकांसाठी पाणीपुरवठा केला जातो, त्या प्रत्येकाकडे अँड्राइड मोबाईल  असल्याने त्या लोकांची क्रयशक्ती वाढल्याचा कयास लावत महापालिकेला तासाभराच्या पाण्यासाठी किमान शंभर ते दीडशे रुपये तरी महसूल मिळाला पाहिजे, अशी भूमिका पाणीपुरवठा विभागाने घेत मीटरप्रमाणे पाणी देण्याचा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Social Waterline Close Municipal