शाहीरीतुन युवकांचे समाज प्रभोधन: शाहीर आझाद नायकवडी

विलास पगार
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

सिडको (नाशिक) - आगामी काळात महायुद्ध झालेच तर ते धर्म आणि पाणी या दोन गोष्टींमुळेच होईल असे सांगून मानवतेचा संदेश नव्या पिढीने महामानवपासून  घेतला पाहिजे असे मत कोल्हापूर दरबार शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केले. आज नायकवाडी हे शिवजयंतीसाठी नाशिकमध्ये आले होते त्यावेळी ते बोलत होते.

सिडको (नाशिक) - आगामी काळात महायुद्ध झालेच तर ते धर्म आणि पाणी या दोन गोष्टींमुळेच होईल असे सांगून मानवतेचा संदेश नव्या पिढीने महामानवपासून  घेतला पाहिजे असे मत कोल्हापूर दरबार शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केले. आज नायकवाडी हे शिवजयंतीसाठी नाशिकमध्ये आले होते त्यावेळी ते बोलत होते.

नायकवाडी म्हणाले की, नव्या पिढीने सर्वच महामानव समजावून घेण्याची आज वेळ आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव समजावून घेतले पाहिजेत. त्यांनी मानवतेचा विचार केला आहे. गेल्या काही वर्षात परिवर्तनवादी विचार मी शाहिरीतून समाजासमोर मांडत आहे. हे काम करताना अडचणी येतात. परंतु, समाज परिवर्तनाचे काम असल्यामुळे त्यातून माघार घेऊ नय असे माझे मत आहे. माझे वडील हेच माझे शाहिरीचे गुरू आहेत त्यांना शाहीर व्हायचे होते. परंतु, होता आले नाही. त्यांनी मला जात व धर्म यापेकक्षा विचारांची नाती महत्त्वाची असतात अशी शिकवण दिली आणि मग थोरांचे विचार मी वाचून पोवाड्यातून समाज प्रबोधन करत आहे. माणुसकी हाच खरा धर्म आहे यावर माझा विश्वास आहे त्यामुळे छत्रपती शिवरायांचे स्वराज्य कसे होते ते समाजासमोर मांडत आहे. हे करताना पर्यावरणाचे रक्षण कसे करता येईल यासाठीही राज्यभर विविध कार्यक्रम करत आहे. लोक धर्माबाबत आणि जातीबाबत दिवसेंदिवस कट्टर होत चालले आहेत असा माझा अनुभव आहे. परंतु, माणुसकी हाच खरा धर्म आणि मानवता हीच खरी जात  हे समजाऊन घेतले पाहिजेत. माणूस म्हणून प्रत्येकाने काम करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. शिवाजी महाराजांचा काळ आणि आत्ताचा काळ यांची तुलना करून मी नव्या पिढीला हा झालेला बदल शाहिरॆतुन समजावून सांगत आहे आणि त्याला यशही मिळत आहे. बऱ्याचदा महामानवांचे विचार न समजून घेताच त्यांच्याबाबत आपण तर्क-वितर्क करत राहतो त्यामुळे सर्वच महामानव युवकांनी समजावून घेतले तर जात आणि धर्माच्या पलीकडे माणूस जाऊ शकतो आणि नव्या जगाचे स्वप्न पूर्ण होऊ शकतेअसेही ते म्हणाले. 

शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वच महामानव मानवतेचा विचार करणारे होते. त्यामुळे नव्या पिढीने जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. आगामी काळात जर महायुध झाले. तर ते धर्म आणि पाणी या दोन्ही गोष्टींमुळे होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरले पाहिजे पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला पाहिजे यासाठीही माझे प्रबोधनाचे काम सुरू आहे असेही ते म्हणाले.

Web Title: Social Welfare of the Youth from Shahir: Shahir Azad Nayakawadi