विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविला आनंद...

प्रा. भगवान जगदाळे
शनिवार, 7 एप्रिल 2018

"कै. रामरावदादा पाटील हे माझे राजकीय गुरू होते. दादांसोबत राजकारणात असताना हितशत्रूंनी मलाही दादांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु उलट दुप्पट जोमाने आपण दादांची पाठराखण केली. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज हा छोटासा अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला."
 - ऍड.शरदचंद्र जगन्नाथ शाह, अध्यक्ष, आदर्श कला महाविद्यालय, निजामपूर-जैताणे ता. साक्री

निजामपूर-जैताणे (धुळे) : ज्येष्ठ नेते कै. रामरावदादा पाटील यांच्या स्मृतिनिमित्त आज (ता.४) सकाळी दहाच्या सुमारास त्यांचे कट्टर समर्थक, पांझरा-कान सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन व आदर्श कला महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. शरदचंद्र शाह यांच्यातर्फे आदर्श प्राथमिक विद्या मंदिर व आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुलच्या सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. यावेळी शेकडो चिमुरड्यांनी या अन्नदानाचा मनापासून लाभ घेतला.

माळमाथा परिसरातील ह्या 'आदर्श' शाळेत हा विधायक उपक्रम राबविल्याबद्दल कै. रामरावदादा पाटील यांचे सुपुत्र, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपचे प्रांतिक सदस्य व विद्याविकास मंडळाचे सभापती सुरेश पाटील यांनी ऍड. शाह यांच्याप्रति ऋण व्यक्त केले. या उपक्रमासाठी दोन्ही विद्यालयांचे मुख्याध्यापकद्वय व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

निजामपूर (ता.साक्री) : येथील आदर्श प्राथमिक विद्या मंदिर व आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित संस्थाचालक ऍड. शरदचंद्र जगन्नाथ शाह आदी..

"कै. रामरावदादा पाटील हे माझे राजकीय गुरू होते. दादांसोबत राजकारणात असताना हितशत्रूंनी मलाही दादांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु उलट दुप्पट जोमाने आपण दादांची पाठराखण केली. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज हा छोटासा अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला."
 - ऍड.शरदचंद्र जगन्नाथ शाह, अध्यक्ष, आदर्श कला महाविद्यालय, निजामपूर-जैताणे ता. साक्री

Web Title: social work in jaitane