एकलहरे औष्णिक वीज केंद्रात सौर प्रकल्प 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

एकलहरे - राज्यातील सात औष्णिक वीज केंद्रात जे २१० मेगावट अथवा कमी क्षमतेचे वीज संच आहेत, ते कालानुरूप बंद करण्यात आले आहेत. त्या संचाच्या जागी सौर ऊर्जा यंत्र (पॅनल) बसविण्यासाठी हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत.

राज्यात ज्या ठिकाणी संच कालमर्यादेमुळे बंद करण्यात आले. त्या संचाच्या जागी अपारंपरिक स्तोत्रातून (सौर ऊर्जा) वीज निर्मिती करण्यासंदर्भात नोव्हेंबरमध्ये संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारी यांच्यात बैठक झाली. त्यात जुन्या संचांच्या जागी सौर ऊर्जा पॅनल टाकण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले.

वीज केंद्र          प्रस्तावित सौर प्र खापरखेडा                                              भुसावळ                   १.००
चंद्रपूर                       ५.००
कोराडी                      ५.०० 
नाशिक।                     २.५०
पारस।                       १.००
परळी।                       २.५०

याच बैठकीत R & M ( Renovation & Modernisation) या औष्णिक संचाचे नुतनीकरण व आधुनिकीकरण बाबत ही चर्चा झाली. कोराडी ६ पूर्ण क्षमतेने चालविण्यात यावा व कोरडी संच ७ च्या आर एन.एम.साठी प्रकल्प अहवाल (DPR) तात्काळ सादर करण्यात यावा असे आदेश देण्यात आले.

जेव्हा तत्कालीन अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी खासदार हेमंत गोडसे व समिती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्वतः कबूल केले होते, कोरडी संच ६ चे नूतनीकरण फसले आहे. व उकईच्या धर्तीवर नाशिकचे व इतर ठिकाणचे R & M संदर्भात अहवाल मागवू पण त्यानंतर ते स्वतःच दीर्घ रजेवर गेले आहेत. व जर एक संचावर तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपयांचा खर्च करून ही नुतनीकरण फसलेले आहे. व दोन वर्षे निर्मिती बंद असल्याने सरासरी 3 लाख २० हजार मेगा युनिट निर्मिती न झाल्याने ते कोट्यवधींचे नुकसान वेगळे, मग अजून तेथीलच संचाचा नुतनीकरनाचा अट्टहास का? हा प्रश्न निर्माण होतो.

जिथे हजारो लोकांच्या उदरनिर्वाह चा प्रश्न निर्माण झाला आहे तिथे नवीन संचही नाही आणि जुन्या R & M (जीर्णोद्धार) ही नाही.एकूणच उत्तर महाराष्ट्रावर अन्याय करून फक्त विदर्भाच्या आणि विशेष करून कोराडी वरच शासनाचे प्रेम असल्याचे दिसते.तसेच सौर प्रकल्प टाकण्यासाठी जुन्या संचाचे स्क्रॅप लवकरात लवकर भंगार मध्ये काढण्याचे आदेशही देण्यात आले आहे. परंतु उत्तर महाराष्ट्रातील नामांकित वीज केंद्राच्या R&M अथवा बदली संचाबाबत कुठलेही धोरण यात चर्चिले गेले नाही. तसेच नाशिक वातावरण सौर ऊर्जेसाठी पोषक नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: Solar project at Eklahare thermal power station