आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवा 

dhule
dhule

देऊर (धुळे) : जिल्ह्यातील अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवा. अशी मागणी आदिवासी आश्रमशाळा शिक्षक कर्मचारी संघटनेने केली आहे. या आशयाचे लेखी निवेदन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे यांना नुकतेच  देण्यात आले. जिल्हाध्यक्ष अनुदानित आश्रमशाळा सुधिर अकलाडे, जिल्हाध्यक्ष शासकीय आश्रमशाळा दिपक चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष (अनु.) योगेश्वर वेंदे, राज्य कमिटी सदस्य भगवंत अहिरे, जिल्हा संघटक एल.डी.देसले, धुळे तालुका अध्यक्ष अमोल पाटिल, विजय भामरे, महिरे, वळवी, पाटील यांच्यासह  आदींनी विविध समस्यांबाबत चर्चा केली व निवेदन दिले.

प्रकल्प अधिकारी हाळपे यांनी समस्यांच्या संदर्भात सकारात्मकता दर्शवित नाशिक आदिवासी विकास विभागाच्या अधिकार्यांकडे प्रश्न मांडतो. असे आश्वासन दिले. निवेदनातील मागण्या अशा- शाळेची वेळ अकरा ते पाच करा. दिवाळी उत्सव अग्रीम मिळावी. एक हजार चारशे 33 कर्मचारींचे थकीत वेतन मिळावे. अतिरिक्त तुकडी वरील कर्मचार्यांच्या मान्यता आदेशातील तुकडी अस्तित्वात असेपर्यंत मान्यता ग्राह्य धरण्यात येईल. ही जाचक अट रद्द करण्यात यावी. वर्ग चार कर्मचार्यांना आश्वासित (वरिष्ठ वेतन श्रेणी) प्रगती योजनेचा लाभ मिळावा. भविष्य निर्वाह निधीचा हिशोब मिळावा. सेवापुस्तक ऑनलाईन प्रकिया करावी. उच्च माध्यमिक शिक्षक व अतिरिक्त तुकडी वरील शिक्षक प्लॅन मधून नाॅन प्लॅन मध्ये वर्ग करावे. शालेय शिक्षण विभागानुसार दिवाळी सुट्ट्यांमध्ये एका आठवड्याची वाढ करावी.

शिक्षण विभागाचे शासन निर्णय ज्यावेळी प्रसिद्ध होतात. तेव्हा जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळे व आश्रमशाळा कर्मचार्यांचे वेगळे शासन निर्णय असतात. असा दुजाभाव राज्य  शिक्षण विभागाने करू नये. कर्मचारी एकच या नात्याने शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com