सटाण्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणांवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

सटाणा : सटाणा शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग व शहरातील वाहतूक कोंडी थांबविण्यासाठी पालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. पालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, सर्व बँकांना सोबत घेत पहिल्या टप्प्यात ही मोहिम राबविणार असून शहर अतिक्रमणमुक्त करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी काल बुधवार (ता.४) रोजी सायंकाळी येथे दिली.

येथील पालिका सभागृहात आयोजित शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व पत्रकारांच्या संयुक्त बैठकीत श्री. मोरे बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्षा संगीता देवरे, नायब तहसीलदार दीपक धिवरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संदीप धोंडगे, पोलीस अधिकारी के. एस. सूर्यवंशी, पालिकेचे गटनेते काकाजी सोनवणे, राकेश खैरनार, दीपक पाकळे, बागलाण एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे आदी उपस्थित होते. बैठकीत जिजामाता उद्यान ते सुकड नाल्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहणारे फेरीवाले, फळविक्रेते, एपे रिक्षा, दुकानांचे रस्त्यावर आलेले हवाई अतिक्रमण काढणे, बँक, पतसंस्था, एटीएम समोर पार्किंगची व्यवस्था जागा मालक व बँक प्रशासनाने करावी, टिळक रोडवरील हातविक्रेत्यांना रस्त्याच्या मध्यापासून आवश्यक ते अंतर निश्चित करणे, दैनंदिन भाजीपाला बाजारातील भाजी विक्रेत्यांनी पालिकेने बांधून दिलेल्या ओट्यावरच विक्री करावी, ओट्याच्या पुढे अतिक्रमण असल्यास ते काढावे, दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी पार्किंग झोन निश्चित करणे, स्कूल बसेसचे थांबे निश्चित करणे, शहरातील महामार्गावर नको त्या ठिकाणी बळजबरीने टाकण्यात आलेले गतिरोधक काढून टाकणे याबाबत चर्चा करण्यात आली. येत्या मंगळवार (ता.१०) रोजी पुन्हा यासंदर्भात सर्व घटकांची एकत्रित बैठक घेऊन झालेल्या कामांवर चर्चा करून निर्णायक टप्पा ठरविण्याचे निश्चित करण्यात आले.

बैठकीस अंबादास देवरे, जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडणीस, बांधकाम अभियंता शालीमार कोर, श्रीकांत रौंदळ, प्रवीण पवार, रोशन खैरनार, दीपक सूर्यवंशी, राकेश येवला, गोरख बच्छाव, गौरव शिंदे आदींसह विविध खातेप्रमुख उपस्थित होते.

Web Title: solving issue of traffic in satana action takes on encroachment