ऑनलाईन बदल्यांमध्ये ‘कही खुशी,कही गम’चे वातावरण 

विजय पगारे
शुक्रवार, 1 जून 2018

इगतपुरी : नाशिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील 4 हजार 692 शिक्षक बदल्यांची अंमलबजावणी  युद्धपातळीवर करण्यात आली. बदल्यांमध्ये ‘कही खुशी,कही गम’, असा अनुभव दिसून आला.बदलीसाठी पसंती दिलेल्या शाळा सीनिअर शिक्षकांना न मिळता बऱ्याच भागात ज्युनिअर शिक्षकांना मिळाल्याचे घडले असल्याचे बोलले जात आहे तसेच भाषेच्या शिक्षकाला समाजशास्त्राच्या शिक्षकाने ‘खो’ दिल्याचा प्रकारही घडला आहे. अशी चर्चा जिल्हाभरातील तमाम शिक्षकांमध्ये होत आहे.

इगतपुरी : नाशिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील 4 हजार 692 शिक्षक बदल्यांची अंमलबजावणी  युद्धपातळीवर करण्यात आली. बदल्यांमध्ये ‘कही खुशी,कही गम’, असा अनुभव दिसून आला.बदलीसाठी पसंती दिलेल्या शाळा सीनिअर शिक्षकांना न मिळता बऱ्याच भागात ज्युनिअर शिक्षकांना मिळाल्याचे घडले असल्याचे बोलले जात आहे तसेच भाषेच्या शिक्षकाला समाजशास्त्राच्या शिक्षकाने ‘खो’ दिल्याचा प्रकारही घडला आहे. अशी चर्चा जिल्हाभरातील तमाम शिक्षकांमध्ये होत आहे.

जिल्हा परिषदेकडील 4 हजार 692  शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली शासन स्तरावरून ऑनलाईन झाली आहे. ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला शिक्षक बदली कार्यमुक्तीचे आदेश दिले. हे आदेश डाऊनलोड करण्याची कार्यवाही झाली.तातडीने हे आदेश गटशिक्षणाधिकार्‍यांकडून केंद्रप्रमुखांना व केंद्रप्रमुखांकडून मुख्याध्यापकांना देण्यात आले.मुख्याध्यापकांनी तातडीने बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केले. बदली झालेल्या शिक्षकांना संबंधित शाळेत तातडीने रुजू होण्याचे आदेश दिले होते.अन्यथा कारवाईचा बडगा उगारला होता.त्यामुळे बदली झालेले शिक्षक कार्यमुक्तीनंतर लागलीच बदलीच्या ठिकाणी हजर झाले मात्र या  बदल्यांमध्ये काही त्रुटीही झाल्या आहेत.         

बदलीपात्र सिनिअर शिक्षकांनी पसंती दिलेल्या शाळा त्यांना न मिळता कनिष्ठ शिक्षकांना मिळाल्या आहेत.मात्र या जागेवर बदलीसाठी काही शिक्षकांनी पसंतीक्रम देऊनही त्यांना ती मिळालेली नाही.भाषा विषयाच्या शिक्षकाला भाषा विषयाच्या शिक्षकाने खो देणे आवश्यक होते.पण भाषेच्या शिक्षकाला समाजशास्त्र विषयाच्या शिक्षकाने खो देण्याचा व अशाच प्रकारे खो दिल्याचे काही प्रकार घडले आहेत.एकेका विषयाला शिक्षकच नाहीत,तर एका विषयाचे दोन-दोन शिक्षक शाळेत आले आहेत.

तसेच काही पती-पत्नी 30 किलोमीटर अंतराच्या बाहेर गेले आहेत. प्रशासकीय बदलीऐवजी विनंती बदल्यांना प्राधान्य दिल्याने काहींची गैरसोय झाली आहे.दरम्यान विस्थापित झालेल्या व पसंतीची शाळा न मिळालेल्या 595  शिक्षकांना पुन्हा पसंतीच्या शाळा नोंदविण्यासाठी सुविधा देण्यात आली आहे. 

प्रशासनाने त्रुटींचा अहवाल मागविला : 
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यात काही त्रुटी,आक्षेप,तक्रार असतील तर  त्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावा, असे निर्देश गटशिक्षणाधिकार्‍यांना दिलेले आहेत.दरम्यान,त्रुटींची दुरुस्ती न झाल्यास व शिक्षकांना न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल,अशी तयारी  शिक्षक संघटनांकडुन सुरु आहे.अशी चर्चा विस्थापित व अन्याय झालेल्या शिक्षकांमध्ये आहे 

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या झालेल्या बदल्या - 
मराठी माध्यम : 
मुख्याध्यापक :188 
पदवीधर शिक्षक : 577 
शिक्षक : 3 हजार 803 

उर्दु माध्यम : 
मुख्याध्यापक : 2 
पदवीधर शिक्षक : 35 
शिक्षक : 77

Web Title: some are agree and some disagree to online transfer of teachers