PHOTOS : वाहनचालकांनो सतर्क व्हा...कारण बेशिस्तांवर आहे पोलीसांची नजर

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

रस्ता अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा यावी, यासाठी वाहनचालकांमध्ये जनजागृती व प्रबोधनात्मक उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. पण तरीही रस्ता अपघातांमध्ये घट होताना दिसत नाही, तसेच वाहनचालक नियमांचे पालन करण्यातही कुचराई करत असल्याने अपघाती बळींची संख्या वाढते आहे. यासाठी शहर पोलिस वाहतूक शाखेतर्फे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी गुरुवार (ता. 14)पासून सकाळी व सायंकाळी दोन तासांची विशेष मोहीम पोलिस आयुक्त हद्दीतील तेरा पोलिस ठाण्यानिहाय राबविण्यात येत आहे

नाशिक : शहर पोलिस वाहतूक शाखेतर्फे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी गुरुवार (ता. 14)पासून सकाळी व सायंकाळी दोन तासांची विशेष मोहीम पोलिस आयुक्त हद्दीतील तेरा पोलिस ठाण्यानिहाय राबविण्यात येत आहे. नाकाबंदी करत वाहनांची तपासणी, हेल्मेटसक्ती, सीटबेल्टची तपासणी केली जात आहे. तरी दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करूनच वाहन चालविण्याचे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. तसेच, बेशिस्त रिक्षाचालकांवरही कारवाईचा बडगा उगारला जात आहे 

Image may contain: 1 person, motorcycle, tree and outdoor

बेशिस्त वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम

नाशिक शहरहद्दीत गेल्या दहा महिन्यांत १३४ रस्ता अपघाताच्या घटना घडल्या. यात १३९ जणांचा हकनाक बळी गेला असून, यात ७८ दुचाकीस्वार आणि दहा चारचाकी चालकांचा समावेश आहे. विशेषतः यात ६७ दुचाकीस्वारांचा बळी हेल्मेट नसल्याने, तर दहा चारचाकी चालकांनी सीटबेल्टचा वापर न केल्याने गेला आहे. त्यामुळे शहर वाहतूक पोलिस शाखेकडून गुरुवारी (ता. १४) पासून बेशिस्त वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. 

Image may contain: 1 person, outdoor

नियमांचे पालन करण्यात कुचराई..अपघाती बळींची संख्येत वाढ 

रस्ता अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा यावी, यासाठी वाहनचालकांमध्ये जनजागृती व प्रबोधनात्मक उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. पण तरीही रस्ता अपघातांमध्ये घट होताना दिसत नाही, तसेच वाहनचालक नियमांचे पालन करण्यातही कुचराई करत असल्याने अपघाती बळींची संख्या वाढते आहे.

Image may contain: 1 person, outdoor

गेल्या जानेवारी ते ऑक्‍टोबरअखेरपर्यंत नाशिक शहर परिसरात रस्ता अपघाताच्या 134 घटना घडल्या आहेत. या अपघातांमध्ये दुचाकीस्वार, चारचाकी चालक, सायकलस्वार आणि पादचारी अशांचा बळी गेला. जे चारचाकीचालक बळी गेले आहेत. त्या दहाही चालकांनी सीटबेल्टचा वापर केला नसल्याचे पोलिस तपासातून समोर आले. 
Image may contain: 2 people, people sitting, motorcycle, shoes and outdoor

 

Image may contain: one or more people, people standing, tree, motorcycle, sky and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special campaign against chaotic drivers Nashik