शिर्डी-हजरत निजामुद्दीनदरम्यान विशेष रेल्वे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

येत्या बुधवारपासून 28 जूनपर्यंत दर बुधवारी (04411) ही विशेष वातानुकूलित रेल्वेगाडी सुटेल. प्रत्येक बुधवारी साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकातून सकाळी दहाला रेल्वेगाडी सुटेल.

नाशिक - रेल्वेगाड्यांवरील गर्दीचा अतिरिक्त ताण विचारात घेऊन मध्य रेल्वेने साईनगर शिर्डी ते हजरत निजामुद्दीनदरम्यान आठवड्याला वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी सोडली जाणार आहे.

येत्या बुधवारपासून 28 जूनपर्यंत दर बुधवारी (04411) ही विशेष वातानुकूलित रेल्वेगाडी सुटेल. प्रत्येक बुधवारी साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकातून सकाळी दहाला रेल्वेगाडी सुटेल. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी पावणेदहाला हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर गाडी पोचेल.

परतीसाठी (04412) मंगळवार, 25 एप्रिलपासून 27 जूनपर्यंत दर मंगळवारी हजरत निजामुद्दीन स्थानकातून मध्यरात्री बारा वाजून दहा मिनिटांनी रेल्वे सुटेल. त्याच दिवशी मंगळवारी रात्री सव्वाअकराला शिर्डीला पोचेल.

Web Title: Special trains between Shirdi and Hazrat Nizamuddin