स्पीड कॅमेऱ्याची मुंबई-आग्रा महामार्गावर नजर

स्पीड कॅमेऱ्याची मुंबई-आग्रा महामार्गावर नजर

इगतपुरी शहर - मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पिंप्रीसदो फाटा, साईप्लाझा हॉटेलजवळ ट्रॅफिक कंट्रोल युनिट स्पीड कॅमेरा बसविण्यात आला आहे. त्याची क्षमता नत्शिक ते मुंबईपर्यंत असेल. कॅमेऱ्याद्वारे वाहनांचा वेग मोजणारा हा भारतातील पहिला प्रयोग असून, यामुळे महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

या कॅमेऱ्यात सुमारे ५०० मीटर लांबच्या गाडीचा वेग समजेल. वाहन अतिवेगाने असेल तर तशी सूचना कंट्रोलरूमला येईल. वाहनचालकाच्या हालचाली, त्यात फोनवर बोलणे, दारू पिणे, गप्पा-मस्करी आदी छायाचित्रे हा कॅमेरा टिपू शकणार आहे. कॅमेऱ्याच्या कक्षेत येणारे वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करीत नसतील तर त्या गाडीमालकाचा तीन महिन्यांसाठी वाहन परवाना रद्द होऊन तसा मेसेज त्याच्या भ्रमणध्वनीवर तत्काळ जाण्याची सुविधा या डिजिटल कॅमेऱ्यात आहे. दररोज होणारे लहानमोठे अपघात व त्यासंबंधित सूचना, घटनास्थळाचे चित्रीकरण काही वेळातच जिल्हा कंट्रोलरूमपर्यंत पोचण्यासाठी पथक कॅमेरा व्हॅनमार्फत सतर्क कार्यरत राहणार आहे. याप्रसंगी मुंबई महामार्ग पोलिस अधीक्षक विजय पाटील, नाशिक महामार्गाचे प्रमुख दिलीप पाटील, आर. जे. फात, टोलप्लाझाचे अरविंद सिंग, सुरक्षाप्रमुख विजय राठोड, राजेश चौबे, महिंद्र कंपनीचे सुरक्षा अधिकारी संजय पाटील, नगराध्यक्ष संजय इंदुलकर, वाहतूक शाखेचे पोलिस उपअधीक्षक सुभाष पवार, ‘आरपीआय’चे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गुप्ता उपस्थित होते.

कॅमेऱ्याची वैशिष्ट्ये 
या कॅमेऱ्याविषयी एक महिना वाहनधारकांमध्ये जनजागृती करण्यात येणार असून, तो कुठेही उचलून नेता येऊ शकतो. त्यानंतर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार पोलिसांना राहतील. ऑस्ट्रेलियन बनावटीच्या १६ लाखांच्या या आधुनिक कॅमेऱ्याद्वारे एक सेकंदात वाहनाची तीन छायाचित्रे, त्यात वाहन क्रमांक, वाहनचालक व गती या विषयाची माहिती उपलब्ध होईल.

पहिल्याच दिवशी एका तासात एका बाजूने ३०० वाहने अतिवेगाने जात असल्याचे कॅमेऱ्यात टिपले गेले. हा कॅमेरा वडपे ते गोंदे या १०० किलोमीटरवर प्रथम वापरण्यात येणार आहे. सरळ रस्त्यावर ८० किलोमीटर प्रतिताशी, तर घाटात ५० किलोमीटर प्रतिताशी वेग कॅमेऱ्यात सेट करण्यात आला आहे. त्यापुढे वेगाने धावणाऱ्या गाड्या वेगवान समजल्या जातील.   
- विजय राठोड, सुरक्षा अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन, मुंबई- नाशिक एक्‍स्प्रेस-वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com