मसाल्याचा व्यवसाय करत प्रविणची मंत्रालयात भरारी 

pravin 2.jpg
pravin 2.jpg

नाशिक : घरात अठरा विश्‍व दारिद्रय, वडील रावळगावच्या आठवडे बाजारात मसाला विकण्याचे काम करतात. शिक्षणासाठी पुरेसा पैसे नसतांना, शिक्षणाविषयी आवड व मनात काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीच्या जोरावर रावळगाव (ता. मालेगाव ) येथील प्रविण दिलीप वाघ या तरूणाने यश मिळविले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक पदाच्या परीक्षेत यश मिळवत स्वप्नांच्या पूर्तीकडे आणखी एक पाऊल प्रविणने टाकले आहे. 

प्रतिकूल परिस्थितीतून प्रविणने मिळविले यश

प्रविणचे बारावीपर्यंतचे शिक्षण रावळगाव येथेच झाले, तर पदवीपर्यंत शिक्षण मालेगावला झाले. मोठ्या भावाच्या शिक्षणासाठी लहान भावाने शिक्षण सोडून वडिलांना कामात मदत करू लागला. प्रविणने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याचे ठरविल्यानंतर, त्यासाठी पुणे गाठले. राहण्यासाठी कुठलीही व्यवस्था नव्हती. सकाळी अभ्यासासाठी पुण्यातील जयकर ग्रंथालयात सकाळी सात ते रात्री बारापर्यंत रोजच्या अभ्यासाची वेळ असायची. त्यानंतर झोपण्याची सुविधा नसल्यामुळे कोणालाही न सांगता मुलांच्या वस्तीगृहाच्या गच्चीवर झोपायला जायचा. तेथील कर्मचाऱ्यांना समजल्यानंतर अंथरूण जप्त करून गच्चीला कुलूप लाऊन घेतले गेले. त्यानंतर काही दिवस बास्केट बॉल मैदानावर तो झोपायचा. पैशाची जास्तच चणचण भासू लागल्याने रविवारी केटरिंगचे कामही करू लागला. अनेक दिवस संघर्षमयी जीवन जगतांना, जिद्द मात्र सोडली नाही. अखेर ऑक्‍टोबर 2016 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक पदावर त्याची नियुक्ती झाली. 

धेय्याकडे वाटचाल सुरूच 
सद्य स्थितीत यश मिळविले असले तरी, आणखी विविध स्पर्धा परीक्षांना प्रविण सामोरे जातो आहे. सध्या प्रविणचे वय अठ्ठावीस वर्षे असून, निश्‍चित केलेल्या धेय्यापर्यंत नक्‍की पोहचू, असा विश्वास तो व्यक्‍त करतो. 

प्रतिक्रिया
स्पर्धा परिक्षेचे वेड वेगळेच असते. ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत सातत्याने अभ्यास करणे महत्वाचे ठरते. सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या विक्रिकर निरीक्षक परीक्षेची तयारी करतो आहे. मला जे कष्ट सोसावे लागले ते इतर मुलांना सोसावे लागू नये यासाठी गावांत अद्ययावत अभ्यासिका उभारण्याची इच्छा आहे. - प्रविण वाघ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com