Spontaneous response to the Auto Expo
Spontaneous response to the Auto Expo

‘ऑटो एक्‍स्पो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव - ‘सकाळ’तर्फे सुरू असलेल्या ‘ऑटो एक्‍स्पो’ला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी ऑटो एक्‍स्पो म्हणजे वाहन खरेदी करणारे आणि महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी एक आकर्षणाचे केंद्र ठरते. एक्‍स्पोमध्ये दुचाकीपासून आलिशान चारचाकी वाहनांची माहिती एका ठिकाणी मिळत असल्याने अनेकजण येथे येऊन माहिती घेतात. यामुळेच दरवर्षीच्या या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळत असून, यंदाच्या महोत्सवातही आज अनेकांनी वाहन बुकिंग करण्याच्या इराद्याने स्टॉलला भेटी देऊन माहिती घेतली.

फोकस हुंदाईकडून आकर्षक सूट
फोकस हुंदाईच्या स्टॉलवर चारचाकीमधील इऑन, सॅंट्रो, वर्ना, ग्रॅंड आय-१०, आय-२०, एक्‍सेंट, थुसॉम या गाड्यांची माहिती उपलब्ध आहे. पेट्रोल- डिझेल अशा दोन्ही प्रकारात मॉडेल्स असून, आय-२० गाडीत एसी, पॉवर स्टेअरींग, टच स्क्रिन म्युझिक सिस्टीम, सहा एअर बॅग, प्रोजेक्‍टर हेड लॅम्प, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, ॲटोमॅटीक एसी, क्रोम डोअर हॅंण्डल अशा सुविधा आहेत. मुख्य म्हणजे फोकस हुंदाईकडून प्रत्येक गाडीवर ऑफर असून ही २० ते ७० हजार रूपयांची सुट या स्वरूपात आहे.

मानराज मोटर्समध्ये सेव्हिंग ऑफर 
मानराज मोटर्सतर्फे ग्राहकांसाठी वाहन खरेदीवर सेव्हिंग ऑफर देण्यात आली आहे. येथे अल्टो ८००, अल्टो के-१०, रिओ, वॅगन आर, स्विफ्ट, सेलेरियो, डिझायर, अटरिगा, इको, ओमनी, रिट्‌झ यांसारख्या गाड्यांची माहिती स्टॉलवर उपलब्ध आहे. रिओ (झेडएक्‍सआयएएमटी) ही ऑटोमॅटिक गिअर शिफ्ट असलेल्या मॉडेलला प्रतिसाद मिळत आहे. तसेच मानराज मोटर्सच्या सतरा मॉडेल्सवर ३० पासून ८० हजार रुपयांपर्यंत बचत ग्राहकांना करता येणार आहे. 

‘आदित्य होंडा’चा आकर्षक एक्‍स्चेंज बोनस 
होंडाच्या चारचाकी वाहनाचे अधिकृत डीलर असलेल्या ‘आदित्य होंडा’च्या स्टॉलवर होंडा सीटी, ब्रिओ, सीआरव्ही, मोबिलियो, जाझ, सात जण बसू शकतील अशी सुविधा असलेली बीआरबी, तसेच अत्याधुनिक सीव्हीटी सिस्टिम असलेली अमेझ यांसारख्या गाड्यांची माहिती उपलब्ध आहे. ‘आदित्य होंडा’तर्फे सर्वच गाड्यांवर फ्री इन्शुरन्स दिला जात असून, शंभर टक्‍के फायनान्सची सुविधाही उपलब्ध आहे. इतकेच नव्हे, तर आकर्षक एक्‍स्चेंज बोनस ऑफर नवीन गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी ठेवण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com