मनमाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मनमाड - केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना मुंबई येथे झालेल्या धक्कबुक्कीचे पडसाद आज मनमाड शहरात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ आज  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) तर्फे करण्यात आलेल्या मनमाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर निषेध मोर्चा काढत इंदौर पुणे महामार्गावर रास्तारोको आंदोलन करून दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली.

अंबरनाथ येथील संविधान दिनाच्या कार्यक्रमांसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हजर असता एका कार्यकर्त्यांने आठवले यांच्यासोबत धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) तर्फे रिपाईचे जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र अहिरे, कार्याध्यक्ष गंगादादा त्रिभुवन, जिल्हा संघटक अनिल निरभवणे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनकर धिवर, शहराध्यक्ष दिलीप नरवडे, जिल्हा संघटक पी आर निळे, तालुकाध्यक्ष कैलास आहिरे यांच्या नेतृत्वाखाली आज शहरात आंदोलन करण्यात आले. 

मनमाड बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार आज शहर कडकडीत बंद होता. नागरिक, व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. सर्वच दुकाने बंद होती. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट होता. यावेळी रिपाई भवन जवळून निषेध मोर्चाला सुरवात झाली. हातात निळे झेंडे घेऊन दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे, आठवले साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. मोर्चा शहरातील विविध मार्गाने जात इंदौर पुणे महामार्गावर गेला असता रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सुमारे अर्धा तास चाललेल्या या रास्तारोकोमुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक जाम होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी विविध वक्त्यांची भाषणे झाली. 

यावेळी दोषींवर कारवाई करावी, आठवले यांच्या सुरक्षेत वाढ करावी आदी मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकारी कैलास चौधरी यांना निवेदन देण्यात आले. स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेनेतर्फे आंदोलनास पाठींबा देण्यात आला. 

यावेळी युवक जिल्हाध्यक्ष रुपेश अहिरे, दिनकर कांबळे, युवक शहराध्यक्ष गुरू निकाळे, सुरेश जगताप, रुख्मिनीताई अहिरे, कमलताई खरात, मंदाताई भोसले, सुरेश शिंदे, मोझेस साळवे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Web Title: spontaneous response to Manmad band