दहावीच्या उत्तरपत्रिकांना फुटलेत पाय 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नाशिक - आयुष्याला कलाटणी देणाऱ्या दहावीच्या परीक्षांबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळ गंभीर आहे काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्याचे कारण आहे की मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांना चक्‍क पाय फुटलेत. काही उत्तरपत्रिका नाशिकच्या विभागीय मंडळाच्या बाहेरील भागात आढळून आल्या आहेत. 

या उत्तरपत्रिका पूर्वीच्या परीक्षेच्या असाव्यात असे माहिती अधिकार कार्यकर्ता संदीप जगझाप यांना सुरवातीला वाटले. पण, बारकाईने पाहिल्यावर त्यांतील गांभीर्य त्यांच्या लक्षात आले. जगझाप यांनी मंडळातील अधिकाऱ्यांना दहावीच्या उत्तरपत्रिका सापडल्याची माहिती देण्यात आली. पण अधिकारी गंभीर नाहीत म्हटल्यावर माहितीच्या अधिकारात त्यांनी उत्तरपत्रिकांच्या रंगीत छायांकित प्रतीची मागणी केली. त्रयस्थाचा कायदेशीर मुद्दा उपस्थित करून मंडळाकडून माहिती देण्यास नकार मिळाला. अखेर जगझाप यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची भेट घेतली असता, सरासरी काढून गुणांकन करीत निकाल जाहीर करण्यात आल्याचे उत्तर मिळाले. 

वरिष्ठांच्या हुकुमाचे ताबेदार 
माहितीच्या अधिकाराचे अपील केल्यावर सुनावणीच्या अगोदर शिक्षण मंडळाच्या कार्यालयात पोचल्यावर जगझाप यांना "वरिष्ठांच्या हुकुमाचे ताबेदार आम्ही आहोत', अशी प्रचिती कार्यालयीन कामकाजातून मिळाली. सुनावणीसाठी बसून राहिल्यावर संबंधित अधिकारी पाऊणतासाने आले. सुनावणी घ्या, असे सुचविल्यावर वेळ लागेल असे सांगत बाहेर थांबण्यास सांगण्यात आले. त्या वेळी आणखी किती वेळ बसायचे असे विचारल्यावर खंडपीठामध्ये आम्ही दिवसभर राहतो, असेही त्यांना ऐकावे लागले. 

""उत्तरपत्रिका कमी मिळाल्याचा विषय पुढे आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र लिहिण्यापर्यंत प्रक्रिया सीमित राहिल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आता गुन्हा दाखल करण्यासंबंधी ठोस कार्यवाही करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.'' 
- राजेंद्र गोधणे (विभागीय अध्यक्ष, शिक्षण मंडळ, नाशिक) 

Web Title: SSC paper leak