दहावी निकाल : जळगाव जिल्ह्याचा 76.92 टक्‍के निकाल; यंदा निकालाची टक्केवारी घसरली

SSC Result
SSC Result

जळगाव ः राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर झाला. जळगाव जिल्ह्याचा यंदाचा सरासरी निकाल 76.92 टक्‍के लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत निकालाचा टक्‍का बारा टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे; परंतु दहावीच्या निकालात यंदाही मुलींचीच आघाडी असल्याचे दिसून आले.

जळगाव जिल्ह्यातून यंदा सुमारे 60 हजार 123 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 46 हजार 248 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जळगाव जिल्ह्याचा निकाल 76.92 टक्के लागला. बारावीप्रमाणे आणि यंदादेखील दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.

जिल्ह्यातून 34 हजार 465 मुलांपैकी 25 हजार 117 मुले उत्तीर्ण झाले आहेत, तर 25 हजार 658 पैकी 21 हजार 131 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यात जिल्ह्यातील मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्‍केवारी 72.88 इतकी असून, उत्तीर्ण मुलींची टक्‍केवारी 82.36 टक्‍के एवढी आहे. 

खानदेश : दहावीचा निकाल 

जिल्हा       प्रविष्ट विद्यार्थी    उत्तीर्ण विद्यार्थी    टक्केवारी 
धुळे           28 हजार 036      21 हजार 618         77.11 
जळगाव     60 हजार 123      46 हजार 248         76.92 
नंदुरबार     19 हजार 935      14 हजार 480         74.44

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com