‘शानबाग’चा प्रज्वल पाटील जळगावातून प्रथम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत प्रचंड उत्सुकता होती. यंदा शहरातील विविध शाळांनी चमकदार कामगिरी केली. शहरातील शानबाग स्कूलचा विद्यार्थी प्रज्वल पाटील हा ९६.४ टक्‍के गुण मिळवून प्रथम, तर आर. आर. विद्यालयाचा नेहील पाटील हा ९६.२० टक्‍के मिळवून द्वितीय आला. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.

जळगाव - दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत प्रचंड उत्सुकता होती. यंदा शहरातील विविध शाळांनी चमकदार कामगिरी केली. शहरातील शानबाग स्कूलचा विद्यार्थी प्रज्वल पाटील हा ९६.४ टक्‍के गुण मिळवून प्रथम, तर आर. आर. विद्यालयाचा नेहील पाटील हा ९६.२० टक्‍के मिळवून द्वितीय आला. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.

दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याने सर्वच माध्यमिक शाळांमध्ये चलबिचल पाहण्यास मिळत होती. दहावी परीक्षेचा निकाल म्हणजेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या वळणाची पहिली पायरी. उत्कंठा वाढविणाऱ्या आजच्या दिवशी उत्साहाचे वातावरण होते. निकाल काय लागणार, किती गुण मिळणार या विचारांची भीती विद्यार्थ्यांच्या मनात होती. दुपारी एकला ऑनलाइन निकाल जाहीर झाला. यानंतर बहुतांश मुलांनी स्मार्टफोनवरच निकालाची वेबसाइट ओपन करून निकाल पाहिला आणि परिवारासोबतच आनंद साजरा केला. वर्षभर अभ्यासानंतर आपल्या कष्टाचे फळ जाणण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये दिसत होती. 

आनंद, उत्साहाचे वातावरण
दहावीचा निकाल लागणार म्हणून सकाळपासून उत्साहाचे वातावरण होते. विद्यार्थी प्रारंभी किती टक्‍के गुण मिळतात म्हणून तणावात होता. मात्र निकाल जाहीर होताच उत्साहाचे वातावरण पसरले. काही पालकांनी स्वीट मार्टवर पेढे घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तर काही दुकानांवर रांगा लागल्याचे दृश्‍यही दिसून आले. शाळांमध्येही शिक्षकवर्ग उत्साहात दिसून आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SSC Results Prajwal Patil First Education Success