भरधाव बस झाडावर आदळल्याने चालक-वाहकासह 15 प्रवासी जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

समोरून येणारा ट्रकचा फोकस चमकल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस लिंबाच्या झाडावर आदळल्याने चालक-वाहकासह 15 प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वरील कन्नड घाटाच्या खाली रांजणगाव फाट्याजवळ आज सकाळी पाचच्या सुमारास झाला.

चाळीसगाव : समोरून येणारा ट्रकचा फोकस चमकल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस लिंबाच्या झाडावर आदळल्याने चालक-वाहकासह 15 प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वरील कन्नड घाटाच्या खाली रांजणगाव फाट्याजवळ आज सकाळी पाचच्या सुमारास झाला. जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

शिंदखेडा डेपोची एम.एच.40 एन 9907 शिंदखेडा-औरंगाबाद बस औरंगाबादहून शिंदखेड्याकडे जात होती. यावेळी कन्नड घाटाखाली असलेल्या मुन्शी भंगार दुकानाजवल बस येताच समोरून येणाऱ्या ट्रकचा फोकस बसवर चमकला. यावेळी बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून समोर असलेल्या निंबाच्या झाडाला बस आदळली. या अपघातात बस चालक टी.टी. वाघ (रा.धरणगाव), वाहक डी. के.वाघ शिंदखेडा यांच्यासह प्रवाशी राहुलसिंग बी. राजपूत (वय.60 रा.सुरत), लक्ष्मण गोविंद गजरवाड (वय. 30 रा. राजुरा), धनराज रमण पवार (वय.35 गोरदखेडा), मीनाक्षी धनंजय पवार (वय. 35 गोराडखेडा), सीमा दीपक देवरे (वय.30, आऊरा) दीपक देवरे (वय.12), मधुकर कौतिक पाटील (वय 50 सर्व रा. गोराडखेडा), अविनाश अशोक काकडे (वय.22 बीड), सतीश चौधरी (वय.40 रा.नांदेड), तन्मय अतुल कुंभारे (वय.15 रा.कन्नड), अंजली अतुल कुंभारे (वय.30 रा.कन्नड), अवधूत अतुल कुंभारे (वय.12), अमोल नागराज सूर्यवंशी (वय.35), भास्कर विठ्ठल वळवी (वय. 35), सोमनाथ रमण पाटील (वय.30), धोंडू तुकाराम पाटील (वय.40), सतिष बबन धायमोडे (वय.28 सर्व रा.कन्नड) हे जखमी आहेत. 

ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावरून अपघातग्रस्त रुग्णांना चाळीसगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर, डॉ. मंदार करंबेळकर यांच्यासह प्रतिभा जाधव, प्रवीण चावरे, अशोक राठोड, एस.बी.बागुल आदी कर्मचाऱ्यांनी मदत करून जखमींवर उपचार केले.

Web Title: ST Bus Accident Driver Conductor 15 Passengers Injury