PHOTO : दुभाजक ओलांडून एसटी घुसली थेट पंक्‍चर दुकानात..अन्...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

नाशिक : विंचूर येथे राज्य परिवहन महामंडळाची येवला आगाराची बसगाडी रस्ता दुभाजक ओलांडून थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पंक्‍चर काढण्याच्या दुकानात शिरली. या अपघातात बसगाडीमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. जीवितहानी झाली नाही. 

अशी घडली घटना...

नाशिक : विंचूर येथे राज्य परिवहन महामंडळाची येवला आगाराची बसगाडी रस्ता दुभाजक ओलांडून थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पंक्‍चर काढण्याच्या दुकानात शिरली. या अपघातात बसगाडीमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. जीवितहानी झाली नाही. 

अशी घडली घटना...

सोमवारी (ता. 9) सकाळी आठच्या सुमारास येवला - नाशिक बसगाडी (एमएच 14- बीटी 3332) येवल्याहून नाशिककडे जात असताना, विंचूरजवळील किसान हॉटेलसमोर असलेल्या खड्ड्यात बस जोरदार आदळली. यामुळे बसगाडी चालकाच्या बाजूकडील पाटा तुटला आणि पाटा स्टिअरिंग रॉडमध्ये अडकला. यामुळे गाडीचे स्टिअरिंग जाम झाले आणि चालकाचेही नियंत्रण सुटल्याने बसगाडी थेट दुभाजक ओलांडून पंक्‍चर काढण्याच्या दुकानात शिरली. बसगाडी थेट दुकानातच शिरल्याने नागरिकांची धावपळ झाली. यात दुकानाचे साहित्यासह मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामपालिका सदस्य नीरज भट्टड, महेंद्र पुंड, अनिल विंचूरकर व स्थानिकांनी बसगाडीमधील प्रवासांना बाहेर काढले. याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात बसचालक सतीश जमदाडे यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. 

Image may contain: outdoor

विंचूर : पंक्‍चर काढण्याच्या दुकानात सोमवारी शिरलेली येवला आगाराची बसगाडी. 

 हेही वाचा > पुन्हा सैराटचा थरार...बहिणीचे प्रेमसंबंध समजताच भावाने..

नशीब बलवत्तर म्हणून वाचला गोलू 

पंक्‍चर काढण्याच्या दुकानात कोणीच नव्हते. अवघ्या काही मिनिटांपूर्वीच दुकानातील गोलू मन्सुरी झोपेतून उठून पाणी आणण्यासाठी बाहेर गेला होता. तो दुकानापासून काही दूर जात नाही तोच बसगाडी दुकानात शिरली. 

हेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्.. 

हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...

बघा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST Bus Accident at Vinchur Nashik Marathi News