इगतपुरीत एस टी कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीसाठी कडकडीत बंद

विजय पगारे 
शनिवार, 9 जून 2018

इगतपुरी : राज्यभरात एस टी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी पुकारलेल्या अघोषित संपाला इगतपुरीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी तालुक्यातील जवळपास अडीचशे कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांनी भाग घेत निषेध नोंदवला आहे. राष्ट्रीय मजदुर काँग्रेस इंटकचे अध्यक्ष भास्कर गुंजाळ यांनी इगतपुरी आगारात भेट घेऊन अघोषित संपाला पाठिंबा जाहीर केला.

राज्यात असलेल्या एक लाख दोन हजार कर्मचाऱ्यांना तातडीने सातवा वेतन आयोग लागू करावा, 1 जुलै 2016 पासून वाढीव सात टक्के महागाई भत्ता द्यावा, जानेवारी 2017 पासून वाढीव चार टक्के महागाई भत्याची थकबाकी तात्काळ द्यावी इत्यादी मागण्यांवर सर्व संघटना ठाम आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी सर्व संघटनांचे पदाधिकारी मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांच्यासोबत बैठकीतून तोडगा काढणार असल्याचे समजते.

इगतपुरी तालुक्यात या संपामुळे पन्नासच्यावर एस टी बसेस बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण विस्कळीत झाले आहे. ऐन शाळा भरण्याच्या मोसमात हा संप चालू झाल्याने विद्यार्थ्यांचे तसेच वृद्धांचे अतोनात हाल होत आहेत. या संपाबाबत लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास राज्यात एस टी महामंडळाला याचा मोठा फटका बसणार आहे. त्यात हा संप मोडीत काढण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील एकशे एकवीस कर्मचाऱ्यांवर निलंबनासारख्या कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. मात्र, हा संप लवकरात लवकर मिटावा याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

परिवहन मंत्र्यांनी चार हजार आठशे चौऱ्यांनव कोटी रुपयांचा करार केला आहे. मात्र, या महागाईच्या काळात हि वाढ अत्यंत तुटपुंजी आहे. शेजारीली कर्नाटकात राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याला साडेएकोणीस हजार बेसिक मिळतेय व सर्व पगार पस्तीस ते चाळीस हजारांवर मिळतोय महाराष्ट्रात साडेएकोणीस हजार संपूर्ण पगार देखील मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांचा हा उद्रेक आहे यावर लवकरच शासनाने तोडगा काढला नाही तर गंभीर परिणाम होतील
.भास्कर गुंजाळ, अध्यक्ष राष्ट्रीय मजदुर काँग्रेस (इंटक) इगतपुरी

Web Title: ST labor unions pay invalid salary