...तर ‘एसटी’ला प्रवासीच भेटणार नाहीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

प्रवासी ‘वाढवा’ नव्हे, ‘घटवा’ अभियान; बस नसल्याचा परिणाम
जळगाव - राज्य परिवहन महामंडळाने (एस.टी.) एक जानेवारीपासून ‘प्रवासी वाढवा अभियान’ सुरू केले आहे. ३१ मार्चपर्यंत हे अभियान आहे. सध्या ज्या पद्धतीने जळगाव-भुसावळ, भुसावळ-जळगाव मार्गावर बस सोडण्याचे नियोजन केले जात आहे, त्यावरून एस.टी.चे ‘प्रवासी घटवा’ अभियान असल्याचा आरोप प्रवासी करीत आहेत.

भुसावळहून जळगावला येताना सकाळी नऊ ते अकरा या कालावधीत प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. यावेळी भुसावळ स्थानकातून जळगावला बस सोडल्या जात नाहीत. बाहेरगावाहून येणाऱ्या शेगाव, चिखली, मलकापूर बसेस त्यातून प्रवाशांना जळगावात यावे लागते. या बस पांडुरंग टॉकीज, अष्टभुजा देवी मंदिर, आनंदनगर, नाहाटा महाविद्यालयाच्या थांब्यावर थांबत नाहीत. यामुळे पासधारकांचा सोबतच ज्येष्ठ नागरिकांचे आर्थिक नुकसान होते.

अधिकाऱ्यांचे साटेलोटे
सकाळ नऊ ते अकरादरम्यान भुसावळहून बस न निघाल्याने साहजिकची परजिल्ह्यातून येणाऱ्या बस भरून धावतात. मात्र, त्या कोठेही थांबत नाहीत. याचदरम्यान दररोज सुमारे दहा ते पंधरा कालिपिली वाहनचालक बस येणार नाहीत, असे सांगून प्रवासी भरून निघून जातात. पंधरा कालिपिली वाहने म्हटली तरी सुमारे दोनशे चाळीस प्रवासी जे एस.टी.तून जाणार होते, त्यांना कालिपिली वाहनाने प्रवास करावा लागला. तेवढे एस.टी.चे उत्पन्न बुडते. या वेळेनंतर बस भुसावळवरून निघतात. त्या बहुतांश रिकाम्या असतात. यामुळे बस सुरू असूनही फायदा एस.टी.ला होत नाही. कालिपिली वाहनचालक व भुसावळचे बस आगार व्यवस्थापकांचे साटेलोटे असल्याशिवाय ऐन गर्दीवेळी बस न सोडता ज्यावेळी गर्दी नसते त्यावेळी बस कशा सोडल्या जातात? याबाबत एस.टी.च्या विभाग नियंत्रकांनी लक्ष घालण्याची गरज आहे. जळगाव स्थानकातून रात्री साडेदहापर्यंत एकही बस जळगावहून भुसावळ, रावेर, मुक्ताईनगरसाठी सोडली जात नाही. 

Web Title: st passenger