शिंदेपाटील चषकाच्या पूर्वतयारीचा शुभारंभ, २५ पासून आयोजन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

येवला : सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या येथील शिंदेपाटील चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून १०१ गरजू शेतकरी कुटुंबीयांना महिन्याचा किराणा तसेच साडी चोळी भेट देण्यात येणार आहे. यावर्षी २५ एप्रिल पासून प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धेच्या पूर्वतयारीला मंगळवारी सुरुवात करण्यात आली. 

येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणात ही स्पर्धा होणार आहे. यासाठी मैदानावर फ्लडलाईटसाठी उभारल्या जाणाऱ्या मनोऱ्याच्या कामाचे व प्रेक्षक गॅलरीचे भुमीपुजन जिल्हा बँकेचे संचालक किशोर दराडे, तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक, नगरसेवक गणेश शिंदे, युवानेते अमोल शिंदे, जय बाबाजी परिवाराचे सुनिल शिंदे, सुशिल गुजराथी, नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, नगरसेवक अजय जैन, आलमगीर शेख, दादाभाई फिटर, राजेंद्र लोणारी, राजेश भांडगे, प्रमोद सस्कर, युनुस शेख, कैलास देशमुख, आदींसह शिंदे पाटील 
फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते. यावेळी तहसीलदार बहिरम, क्षिरसागर यांनी मनोगत व्यक्त करतांना समाज उपयोगी स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन केले.

गेल्या दोन वर्षात शिंदे पाटील फाऊंडेशन तर्फे भरवण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला.शिंदे पाटील फाऊंडेशनच्या कल्पनेतून सामाजिक जबाबदारीचे भान राखण्यासाठी यंदाही तालुक्यातील १०१ गरिब शेतकरी कुटुंबिंयाना एक महिना पुरेल एवढा किराणा सामानाचे वाटप करण्यात येणार आहे. स्पर्धेचे नियोजन अन् सामाजिक उपक्रम पाहून शहरातील विविध दानशूरांनी मदत देण्याचे जाहीर केले आहे.

२५ एप्रिलला सुरु होणाऱ्या स्पर्धेनिमित्ताने जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना किराणा व आदिवासी स्रियांना साडीचोळी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे संस्थापक नगरसेवक गणेश शिंदे, जय बाबाजी परिवाराचे सुनिल शिंदे यांनी दिली.
राज्यासह राज्याबाहेरील संघाने हजेरी लावल्यामुळे शिंदेपाटील चषक स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहेत. शहरातील महिलांनीही क्रिकेटचे सामने पाहण्या साठी मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत. पूर्वानुभव लक्षात घेता  पाटील 

फाऊंडेशनने स्वामी मुक्तानंद विद्यालयाजवळील मैदानावर सर्व बाजूने स्टॅन्ड उभारणी करण्याचे नियोजन केले असून त्यामुळे प्रेक्षकांना सामन्यांचा आनंद चांगल्याप्रकारे लुटता येणार आहे. जिल्ह्यातील आदिवासींना किराणा व वस्त्रवाटप साठी यावर्षीसुध्दा शहरातील अनेक दानशूर किराणा व वस्रवाटप कार्यक्रमासाठी देणगी देणेसाठी पुढे येत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले. आभार प्रशांत शिनकर यांनी मानले.खबरदार क्रिकेट संघ,जागृती क्रिकेट पाटील फ्रेंड सर्कल,लबक फ्रेंड सर्कल, जाणता राजा मंडळ यांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Web Title: starting preparations of shinde patil cricket competition