येवला - जनकल्याण समितीच्या रुग्णोपयोगी सहित्य केंद्राचा शुभारंभ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

 

येवला : शहरात जनकल्याण समितीद्वारे सुरु होत असलेल्या रुग्णोपयोगी केंद्र ही नक्कीच दिलासादायक उपक्रम आहे. रुग्णांना अडचणीत कुबड्या, वॉकर, वॉकिंग स्टिक, फउलर बेड, कांड चेअर, व्हील, चेअर, कंबर व मानेचा पट्टा, बॅक रेस्ट, एअर बेड या साहित्याची मदत मिळणार असल्याने नक्कीच गरजूंना आधारवड असा हा उपक्रम असल्याचे प्रतिपादन अस्थिरोगतज्ञ डॉ. विजय काकतकर यांनी केले.

 

येवला : शहरात जनकल्याण समितीद्वारे सुरु होत असलेल्या रुग्णोपयोगी केंद्र ही नक्कीच दिलासादायक उपक्रम आहे. रुग्णांना अडचणीत कुबड्या, वॉकर, वॉकिंग स्टिक, फउलर बेड, कांड चेअर, व्हील, चेअर, कंबर व मानेचा पट्टा, बॅक रेस्ट, एअर बेड या साहित्याची मदत मिळणार असल्याने नक्कीच गरजूंना आधारवड असा हा उपक्रम असल्याचे प्रतिपादन अस्थिरोगतज्ञ डॉ. विजय काकतकर यांनी केले.

येथे सुरु झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती संचलित स्व.उत्तमभाऊ चंडालिया रुग्णोपयोगी सहित्य केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी बुधवार (ता.9) मर्चंन्ट बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृह येथे उत्साहात झाला.याप्रसंगी व्यासपिठावर हरिओम तिर्थ स्वामी, डॉ. काकतकर, जनकल्याण समितीचे प्रांत सहकार्यवाह विनायक डंबीर, विजयकुमार चंडालीया, मुकुंद गंगापुरकर हे उपस्थित होते.

हरिओम तिर्थ स्वामी यांनी,तनाची शुद्धी ही स्नानाने, मनाची शुद्धी ही भक्तीने तर धनाची शुद्धी ही दानाने होत असते.समितीद्वारे जे समाज उपयोगी उपक्रम राबविले जात आहेत ते स्तुत्य असुन यासाठी दानशुर व्यक्तींचे असलेले सहकार्य हे खुप महत्वाचे आहे. रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरु करण्यासाठी ज्या दानशुर व्यक्तींनी पुढाकार घेवुन उपक्रम सुरु केला त्यांचे कौतुक डंबीर यांनी केले. डॉ.माहेश्वर तगारे यांनी रुग्णोपयोगी साहित्य केंद्राची माहिती दिली.यावेळी डॉ. काकतकर यांनी या सहित्य केंद्रास दिलेला एकविस हजार रुपये मदतीचा धनादेश व शहरातील विनोद वडे यांनी एक लाखाची मदत दिले बाबत त्यांचे आभार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

सूत्रसंचालन अरविंद जोशी यांनी केले. या साहित्य केंद्रात गरजू नागरिकांना कुबड्या, वॉकर, वॉकिंग स्टिक, फउलर बेड, कांड चेअर, व्हील, चेअर, कंबर व मानेचा पट्टा, बॅक रेस्ट, एअर बेड, अश्या विवीध साहित्य फक्त डिपॉझिट तत्त्वावर मिळणार असुन शहरातील श्रीराम कॉलनी येथील मित्तल पॅलेस येथे हे केंद्र सुरु राहणार आहे तर तेथे दोन सेवक हे काय कार्यरत राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

कार्यक्रमाला प्रभाकर झळके,येमकोचे सदस्य सुशिल गुजराथी, बापु काळे, किशोर सोनवणे, नारायण शिंदे, सुधाकर भांबारे, अ‍ॅड. जुगलकिशोर कलंत्री, आनंद शिंदे, प्रेमलता चंडालिया, मदन चंडालीया, विनोद वडे, विजयकुमार श्रीश्रीमाळ, राजेश भंडारी, कृष्णासा वडे, ज्ञानेडर लुटे, ज्ञानेडर सांबर, आशिष भोजने, राजेंद्र देवगावकर, बाळासाहेब धांडे आदींसह रा.स्व.संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.   

Web Title: starts a patient equipment from jankalyan samiti in yeola