
नंदुरबार : जिल्ह्यातील 3 शिक्षकांना ‘राज्य आदर्श शिक्षक’ पुरस्कार
पुरुषोत्तमनगर (जि. नंदुरबार) : विद्याविहार येथील माध्यमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका हेमलता प्रल्हाद पाटील व गुरुवर्य गोविंद श्रीपत पाटील माध्यमिक विद्यालय परीवर्धा या शाळेचे शिक्षक के .एन .पाटील, आदर्श हायस्कूल कवळीथ येथील उपशिक्षक जितेंद्र जाधव यांना नंदुरबार जिल्ह्यातून या तिघांना क्रीडा संस्कृती फाउंडेशन तर्फे दिला जाणारा ‘राज्य आदर्श शिक्षक’ (State Ideal Teacher award) पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऑलिम्पियन अशोक ध्यानचंद, जलालुद्दीन रिजवी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व ब्लेझर असे होते. (State Ideal Teacher award to 3 teachers in district Nandurbar News)
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कालिका देवी मंदिर संस्थान नाशिकचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील होते. पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथे पार पडला. पुरस्कारासाठी राज्यातून विविध जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात विविध उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
अशोक ध्यानचंद यांनी मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीच्या क्षेत्रामध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी, हॉकीच्या सामन्यात करावा लागणारा संघर्ष, अटीतटीचे सामने, त्यात मिळालेला विजय, त्यातून मिळणारा आनंद व म्हणून त्यांना ‘हॉकीचा जादुगर’ अशी मिळालेली ओळख अशा आठवणी जागवल्या. पुरस्कार प्राप्त शिक्षकांची पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, श्री चक्रधर स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पाटील आदींनी अभिनंदन केले.