स्केटिंग स्पर्धा : पुण्याच्या खेळाडूंची ३४ पदकांसह आघाडी कायम 

scetting nandurbar state copitition
scetting nandurbar state copitition

नंदुरबार : पथराई (ता. नंदुरबार) येथील के. डी. गावित क्रीडा संकुलात सुरू असलेल्या तिसाव्या राज्यस्तरीय रोलर स्पीड स्केटिंग स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंची यशस्वी घोडदौड कायम असून, नागपूर, मुंबई उपनगर व ठाणे येथील खेळाडूंनी आपल्या खेळाचा उत्कृष्ट नमुना सादर करीत ते पदकतालिकेत अनुक्रमे १६ व ६ पदकांसह दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. 

दरम्यान, ७ ते ९ व ९ ते ११ वयोगटातील व रोलर हॉकी सामने संपल्यानंतर १४ ते १७, १७ पेक्षा अधिक या वयोगटातील खेळाडूंचे इनलाइन- क्वॉड्स रिंक व रोडचे सामने रंगले आहेत. यात कस्तुरी ताह्मणकरला (नागपूर) तीन सुवर्णपदके, खुशी शाहला (मुंबई) दोन सुवर्णपदके, साम्या मिस्त्रीला (मुंबई) दोन सुवर्णपदके, सियादला (ठाणे) दोन सुवर्णपदके, माजीन मेमनला (पालघर) दोन सुवर्णपदके, सौरभ भावेला (पुणे) एक सुवर्णपदक व एक रौप्यपदक, अथर्व कुलकर्णीला (पुणे) एक सुवर्णपदक व एक रौप्यपदक, अंश आर्यला (औरंगाबाद) एक सुवर्णपदक व एक रौप्यपदक, सानिका गुलवानीला (पुणे) दोन रौप्यपदके, वॅलेरी लोबोला (पालघर) एक सुवर्णपदक व एक रौप्यपदक, माजीन मेमनला (पालघर) दोन सुवर्णपदके यासह इतर खेळाडूंनी साजेशी कामगिरी करीत पदके पटकाविली. 

आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा दबदबा कायम 
निखिलेश तभाने, अथर्व कुलकर्णी, सौरभ भावे, नशा पिठावाला व यशराज पवार यांनी आपापल्या क्रीडाप्रकारांत वर्चस्व कायम राखत सुवर्णपदकांसह विजेतेपद पटकाविले. 


पदकतालिका 
जिल्हा - सुवर्ण - रौप्य - कांस्य 

पुणे - १२ - १८ - ४ 
नागपूर - ७ - ४ - ५ 
मुंबई उपनगर - ४ - १ - १ 
ठाणे - ३ - १ - २ 
औरंगाबाद - १ - १ - ० 
पालघर - २ - ० - ० 
रायगड - ० - ३ - ० 
नाशिक - ० - ० - ५ 
कोल्हापूर - ० - १ - १ 


येथील वातावरण खेळाडूंना खेळण्यासाठी पोषक आहे, तसेच नियोजनही चांगले आहे. मात्र, काही प्रमाणात भौतिक सुविधांचा अभाव असल्याने आगामी काळात त्या पूर्ण होतील. जेणेकरून याच ठिकाणी राहून होणारी गैरसोय टाळता येईल. 
- डॉ. प्राजक्ता सावंत, सांगली 

येथे आम्ही चौथ्यांदा आलो आहोत. येथे इतर सोयी-सुविधा चांगल्या असून, निवासव्यवस्था मात्र अपूर्ण असल्याने नंदुरबार शहरात जावे लागते. मात्र, शहरातील हॉटेल व लॉजिंगमध्ये दुप्पट- तिपटीने शुल्क आकारले जाते. येथील निसर्गरम्य रोड ट्रॅक खूपच आवडला. 
- हेमा नाईक, मुंबई उपनगर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com