Jayant Patil | गावपातळीपर्यंत संघटन मजबूत करा : जयंत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

statement of jayant patil about if NCP

Jayant Patil | गावपातळीपर्यंत संघटन मजबूत करा : जयंत पाटील

साक्री (जि. धुळे) : राष्ट्रवादीला यश मिळवून द्यायचे असेल तर गावपातळीपर्यंत संघटना मजबूत हवी.

बूथ समित्या पूर्ण करून अधिकाधिक सदस्यसंख्या वाढवावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. (statement of jayant patil about if NCP wants to achieve success organization should be strong up to village level dhule news)

येथील विश्रामगृह सभागृहात झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे, अमळनेर येथील आमदार अनिल पाटील, निरीक्षक अर्जुन टिळे, जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र मराठे, जिल्हा परिषद सदस्य तथा विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे, किरण पाटील, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, किरण शिंदे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज महाजन, ॲड. नरेंद्र मराठे, प्रा. नरेंद्र तोरवणे, विलास देसले, राजेश क्षीरसागर, ॲड. योगेश कासार, गिरीश नेरकर, सयाजी ठाकरे, भय्यासाहेब साळवे, अक्षय सोनवणे, कल्पेश सोनवणे, महिला आघाडीच्या संजीवनी गांगुर्डे, रोहिणी कुवर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणुका कधीही लागतील

कार्याध्यक्ष जितेंद्र मराठे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी साक्री विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी मिळावा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे केली. यावर आधी संघटना मजबूत करा, वेळ आल्यास नक्कीच राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघाची मागणी करेन, असे आश्वासन या वेळी श्री. पाटील यांनी दिले. एकनाथ खडसे यांनीदेखील संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. तसेच सध्याचे राजकीय वातावरण बघता निवडणुका वेळेआधीच, कधीही लागू शकतात. अशा वेळी कार्यकर्त्यांनी यासाठी सज्ज राहण्याचेदेखील आवाहन केले.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

...तर आमदार नक्की विजयी होईल

बैठकीत सुरपान येथील शेतकरी गोविंदराव देवरे यांनी पांझराकान सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे केली. या वेळी त्यांनी सांगलीच्या धर्तीवर साक्रीचा कारखाना सुरू केल्यास तालुक्यातून नक्कीच राष्ट्रवादीचा आमदार विजय होऊ शकेल, यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. दरम्यान, या वेळी धनगर, ठेलारी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्यकारिणीत समाजाच्या प्रतिनिधींना स्थान देण्याची मागणी केली.